subhedaar movie new release date and Maval Jaga Zala Ra Official Song out now SAKAL
मनोरंजन

Subhedar Movie: सुभेदार सिनेमाची रिलीज डेट बदलली पण चाहत्यांना मोठा आनंद, पहा नवीन तारीख

आज सुभेदारचं पहिलं गाणं रिलीज झालंय.

Devendra Jadhav

Subhedar Movie News: गेल्या अनेक महिन्यांपासुन ‘सुभेदार’ सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. ‘सुभेदार’ चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वा़ट पाहत आहेत. अशातच या सिनेमाचं पहिलं गाणं आज रिलीज झालंय.

याशिवाय निर्मात्यांनी सिनेमाविषसी एक महत्वाचा निर्णय घेतलाय, ज्यामुळे सुभेदारची वाट पाहणाऱ्यांना फॅन्सना आनंद झालाय.

‘सुभेदार’ हा चित्रपट नरवीर तानाजी मालुसरे यांच्या भावनिक आणि कौटुंबिक आयुष्य दाखवत त्यांचे शौर्य आणि पराक्रम आपल्यासमोर ठेवणार आहे. आज सुभेदारचं पहिलं गाणं रिलीज झालंय.

(subhedaar movie new release date and Maval Jaga Zala Ra Official Song out now)

मावळं जागं झालं रं पहिलं गाणं

छत्रपती शिवाजी महाराजांना तळपत्या सुर्याची उपमा देऊन मावळं जागं झालं रं हे सुभेदार मधलं पहिलं गाणं आज रिलीज झालंय. या गाण्यात शिवाजी महाराजांचा शेतकऱ्यांविषयी असलेला आदर आणि सन्मान पहायला मिळतो.

सुभेदार सिनेमाच्या पहिल्याच गाण्यात चिन्मय मांडलेकर शिवाजी महाराजांच्या भुमिकेत झळकतो आहे. तर विराजस कुलकर्णी आणि दिग्पाल लांजेकर झळकताना दिसतात.

सिनेमाची रिलीज डेट बदलली

सुभेदार सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज झाल्यावर सिनेमाविषयी मोठी अपडेट समोर आलीय. सिनेमाच्या निर्मात्यांनी सिनेमाची रिलीज डेट बदलली आहे.

सिनेमा २५ ऑगस्टला रिलीज होणार होता. पण आता मात्र सिनेमाची रिलीज डेट बदलली आहे. सिनेमा आता एक आठवडा आधी म्हणजे १८ ऑगस्टला रिलीज होणार आहे.

सुभेदार सिनेमाची उत्सुकता

तान्हाजी मालुसरेंच्या भुमिकेत अजय पुरकर झळकत आहेत. सूर्याजी मालुसरेंच्या दमदार भूमिकेत अभिजीत श्वेतचंद्र, तर त्यांच्या पत्नी यशोदाबाईंची भूमिका शिवानी रांगोळे हिने साकारली आहे.

मालुसरे कुटुंबीयतील महत्वाचे सदस्य असलेल्या शेलारमामांच्या भूमिकेत समीर धर्माधिकारी दिसणार आहे.

तान्हाजीरावांच्या आईची भुमिका पार्वतीबाईंच्या भूमिकेत उमा सरदेशमुख आणि रायबाची भुमिका अर्णव पेंढारकर दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला, कोणते शेअर्स चमकले?

Dhantrayodashi 2025: धनत्रयोदशीला मिठाशी संबंधित 'या' गोष्टी करा, आर्थिक अडचणी दूर होतील

Latest Marathi News Live Update : मध्यप्रदेशातील इंदोरमध्ये २५ तृतीयपंथियांनी विष घेतले

Pakistan Semi Final Scenario WC: पाकिस्तानची 'नौका' श्रीलंकेतच बुडणार! उपांत्य फेरी सोडाच, हे तर तालिकेत तळावरच राहणार

Viral Video: मुंबईत राम मंदिर स्टेशनवर ‘थ्री इडियट्स’चा खऱ्या आयुष्यात सीन, व्हिडिओ कॉलवर झाली प्रसूती... 'हा' ठरला रँचो

SCROLL FOR NEXT