Me Mogambo Ani Kandepohe  
मनोरंजन

Viral Teaser : 'मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे' सुबोध भावेचं चाललंय काय?!

अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री मधुरा वेलणकर आता 'मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे' या शॉर्टफिल्ममध्ये दिसणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Subhodh Bhave Madhura Velankar Me Mogambo Ani Kandepohe : मराठी मनोरंजन विश्वामध्ये सध्या वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध विषयांवरील चित्रपट प्रदर्शित होत आहेत. आता मराठी चित्रपटविश्वातून एक गोड बातमी समोर आली आहे. ती म्हणजे प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेचा 'मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे' या शॉर्टफिल्ममध्ये दिसणार आहे. त्याची चर्चा सुरु झाली आहे.

अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री मधुरा वेलणकर आता 'मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे' या शॉर्टफिल्ममध्ये दिसणार आहेत. कॉटनकिंगचे संचालक कौशिक मराठे यांची प्रस्तुती असलेल्या आणि अद्भुत प्रॉडक्शन्सच्या मोनिका धारणकर व वैभव पंडित यांची निर्मिती असलेली ही शॉर्टफिल्म १२ मे रोजी सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित होणार आहे. नुकताच या शॉर्टफिल्मचा जबरदस्त टीझर आणि पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला.

या शॉर्टफिल्म मध्ये अनिरुद्ध देवधर आणि गंगुबाई फेम सलोनी दैनी हे पण प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.सहज लिखाणासाठी ओळख असलेल्या मोनिका धारणकर यांनी या फिल्मचं लेखन केल आहे आणि ऍड-फिल्म मेकर वैभव पंडीत यांचं दिग्दर्शन आहे.

अत्यंत चमत्कारिक असं नाव असलेल्या या त्यांच्या नव्या शॉर्टफिल्मची कथा यावेळी कुठल्या शैलीतील असेल? कशी असेल? सुबोध भावे आणि मधुरा डिजिटल प्लॅटफॉर्मवर आले आहेत म्हणजे काहीतरी कमाल असणार यात शंका नाही. कॉटनकिंगनं नेहमीच दर्जेदार शॉर्ट फिल्मद्वारे संवेदनशील विषय मांडण्यात पुढाकार घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Patient Missing: खळबळजनक घटना! दोन महिन्यांपूर्वी ICU मध्ये दाखल केल अन्... भाजप नेत्याचे सासरे ससून रुग्णालयातून गायब?

Mumbai News : अंधेरी स्थानकातच तरुणीच्या धर्मांतराचा प्रयत्न? वृ्द्ध करत होता प्रार्थना; प्रवाशानं शूट केला व्हिडीओ

Latest Marathi News Update LIVE : पंतप्रधान मोदींचे शपथविधी स्थळावर आगमन

Bharatbhushan Kshirsagar: बीडचे शरद पवार! कोण आहेत भारतभूषण क्षीरसागर? ऐन निवडणुकीत त्यांची एवढी चर्चा का होतेय?

माधुरी दीक्षितचा नवा अंदाज, 'मिसेस देशपांडे' सीरिजमध्ये दिसणार धकधक गर्ल, साकारणार सीरियल किलरची भूमिका

SCROLL FOR NEXT