subodh bhave 
मनोरंजन

पत्नीसह सुबोध भावेने घेतली लस; चाहत्यांना केलं आवाहन

स्वाती वेमूल

देशभरात १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांनाही कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. ही लस घेण्यासाठी कलाविश्वातील अनेक कलाकार पुढे सरसावले आहेत. मराठीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावेनं पत्नीसह लशीचा पहिला डोस घेतला आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत त्याने याबद्दलची माहिती दिली. यासोबतच त्याने चाहत्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. 'लस घेतली तरी काळजी घ्यायचीच आहे', असं त्याने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय. 

सुबोध भावेसह त्याच्या कुटुंबीयांना झाली होती कोरोनाची लागण
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सुबोध भावे, त्याची पत्नी मंजिरी आणि मोठा मुलगा कान्हा यांना कोरोनाची लागण झाली होती. तिघांनीही स्वत:ला घरीच क्वारंटाइन करून घेतलं होतं. 

देशात १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरणाला सुरुवात झाली. त्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वांत प्रथम लस उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर १ फेब्रुवारीपासून पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांसाठीच्या लसीकरणाला सुरुवात झाली. तर १ मार्चपासून सुरू झालेल्या तिसऱ्या टप्प्यात वयाची ६० वर्षे पूर्ण झालेले ज्येष्ठ नागरिक आणि वयाची ४५ वर्षे पूर्ण होण्यासह सहव्याधी असलेले नागरिक यांच्या लसीकरणाला प्रारंभ झाला. आता १ एपिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली. मुंबई १०८ केंद्रांवर ही मोहीम सुरू झाली आहे. 

राज्यात करोनाच्या दैनंदिन रुग्णवाढीने गुरुवारी नवा उच्चांक नोंदवला. गेल्या २४ तासांत राज्यात ४३,१८३ नव्या रुग्णांचे निदान झाले, तर २४९ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ३,६६,५३३ झाली आहे. त्यातील सर्वाधिक ६४,५९९ रुग्ण पुण्यात असून, मुंबईतील ५४,८०७ रुग्णांचा समावेश आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT