Subodh Bhave at Sindkhedaraja at the birthplace of Rajmata Jijau on Gurupurnima 2023
Subodh Bhave at Sindkhedaraja at the birthplace of Rajmata Jijau on Gurupurnima 2023  SAKAL
मनोरंजन

Subodh Bhave: जय जिजाऊ! गुरुपौर्णिमेला सुबोध भावे राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी सिंदखेडराजाला

Devendra Jadhav

Subodh Bhave Gurupurnima Special Post News: अभिनेता सुबोध भावे हा मराठी सिनेसृष्टीतला हरहुन्नरी अभिनेता. सुबोध भावेने आजवर विविध भुमिका साकारुन मराठी प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे.

सुबोध भावेने आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने राजमाता जिजाऊंचं जन्मस्थान सिंदखेडराजाला भेट दिली. सुबोध भावेने यानिमित्ताने सोशल मिडीयावर खास पोस्ट केलीय.

(Subodh Bhave at Sindkhedaraja at the birthplace of Rajmata Jijau on Gurupurnima)

सुबोध भावेने जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेडराजाला भेट दिली. सुबोधने माँ जिजाऊ जन्मस्थानाचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पोस्ट करुन सुबोध लिहीतो..

आज गुरूपौर्णिमा, राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थानी म्हणजे सिंदखेडराजा येथे त्यांचा जन्म झाला त्या वास्तूला भेट देण्याचा योग आला.

स्वातंत्र्याचा पहिला हुंकार जिथे उमटला त्या पवित्र वास्तूच आणि आई जिजाऊं यांचे आशिर्वाद घेता आले. आई जिजाऊ आणि कळत-नकळत संस्कार करणार्‍या सर्व गुरूंना मनापासून वंदन आणि साष्टांग नमस्कार, अशी पोस्ट सुबोधने शेअर केलीय.

दरम्यान एका मुलाखतीत सुबोधने त्याला अभिनेता व्हायचं नव्हतं याचा खुलासा केलास. सुबोध म्हणाला की, 'मला अभिनेता कधीच व्हायचं नव्हतं.. मला मॉडेलच व्हायच होतं. अगदी कॉलेजला असल्यापासून मला हेच क्षेत्र हवं होतं.

पण जे स्वप्न तेव्हा पूर्ण झालं नाही ते आता पूर्ण होतंय.. कारण 'फुलराणी' चित्रपटात मी अशाच मॉडेल्सला घडवत आहे. या निमित्ताने मला हे खूप रिलेट होत होतं.. ते क्षण मला अनुभवता आले.

सुबोध पुढे म्हणाला होता की.. मला माझ्या कॉलेजचे दिवस आठवले. त्यामुळे हे पात्र करताना मला खूप आवडत होतं. मी माझं स्वप्न जगत होतो.

प्रियदर्शिनी किंवा इतर मुली रॅम्प वॉक करताना मी स्वतःला तिथे पाहत होतो. कारण माझीही प्रचंड इच्छा होती, रॅम्प वॉक करायची.'

अशा शब्दात सुबोधने आपली इच्छा बोलून दाखवली. सुबोध अलीकडेच फुलराणी आणि वाळवी सिनेमात दिसला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Iran President Helicopter Crash : इब्राहिम रईस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत खामेनींच्या मुलाचा हात? इराणमध्ये सत्तासंघर्ष पेटणार, जाणून घ्या सविस्तर

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

SCROLL FOR NEXT