Subodh Bhave fans gives him special birthday gift actor shared video sakal
मनोरंजन

Subodh Bhave: वेडी माणसं! सुबोध भावेला फॅन्सनं दिलेलं बर्थ डे गिफ्ट पाहून तुम्हीही..

अभिनेता सुबोध भावेला चाहत्यांनी दिलेल्या गिफ्टचा एक खास व्हिडिओ त्याने शेयर केला आहे.

नीलेश अडसूळ

subodh bhave : अभिनेता सुबोध भावे याचा गेल्या महिन्यात 9 नोव्हेंबर रोजी वाढदिवस झाला, या वाढदिवसानिमित्त सुबोधला अनेकांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. पण त्याच्या चाहत्यांनी त्यालाएक खास गिफ्ट पाठवलं आहे, हे गिफ्ट पाहून सुबोध तर चकित झालाच तर तुम्हीही चकित व्हाल.. म्हणून त्याचा एक व्हिडिओ सुबोधने शेयर केला आहे.

मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेता म्हणजेच सुबोध भावे (subodh bhave). सुबोध वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका नेहमी साकारत असतो आणि त्यामुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. सुबोध आज मराठीतील सुपरस्टार झाला असला तरी त्याच्यासाठी हा प्रवास सोप्पा नव्हता. मोठा संघर्ष करून तो इथवर पोहोचला आहे. म्हणूनच त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. याच त्याच्या चाहत्यांनी असे गिफ्ट त्याला दिले आहे, पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसेल.

या व्हिडिओमध्ये चाहत्यांनी खासी भेटवस्तू स्वतः तयार करून पाठवल्या आहेत. हा व्हिडिओ शेयर करत सुबोधने एक भन्नाट कॅप्शन दिले आहे. तो म्हणतो.. ''वेडी माणसं.... दरवर्षी माझ्या वाढदिवसाला माझा फॅनक्लब काहीतरी विलक्षण भेट पाठवत असतो. त्या सुंदर अशा भेटीसाठी अप्रतिम कल्पना निवडतो आणि पूर्ण करायला प्रचंड मेहेनत घेतो. त्यांच्या आयुष्यातील अत्यंत मौल्यवान वेळ मला भेट देता यावी म्हणून कारणी लावतो.

''या वर्षीची भेट सुध्दा तितकीच विलक्षण आहे. व्यापार खेळ असतो तसा त्यांनी माझ्या आत्तापर्यंतच्या कलेच्या प्रवासातले टप्पे निवडून त्याचा एक बैठा खेळ बनवलाय.
त्यात मी काम केलेले विविध चित्रपट,मालिका,नाटकं आहेत. सोंगट्या आहेत,पैसे आहेत, फासे आहेत आणि खेळाचे नियम सुध्दा आहेत. त्याचबरोबर एक पोस्टपेटी आहे,त्यांच्या पत्रांनी भरलेली. काय बोलू??????? निशब्द!!!!!!!!''

पुढे तो म्हणतो, ''खरं म्हणजे आत्ता माझ्या डोळ्यासमोर माझे सर्व निर्माते, दिग्दर्शक, लेखक, सहकलाकार आणि पडद्यामागचे कलाकार सर्व आले.त्यांच्यामुळे मला चांगल्या भूमिका मिळाल्या आणि त्यामुळे दृष्ट लागेल असा fanclub मिळाला. माझ्या fanclub मधील सर्वांना मनापासून धन्यवाद इतकी सुंदर भेट दिल्याबद्दल. तुम्हा सर्वांवर नितांत प्रेम! तुम्हाला उत्तम आरोग्य आणि आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. (आता आम्ही सगळे एकत्र बसून तुम्ही दिलेला हा माझ्या करीअर चा boardgame खेळू).. प्रेम..'' अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Hamas Ceasefire Broken: ‘’गाझावर पूर्ण ताकदीने हल्ला करा...’’ ; नेतान्याहू यांनी लष्कराला दिले आदेश!

Prashant Kishor Notice : बिहार निवडणुकीआधी प्रशांत किशोर यांना धक्का! ; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ जसलोक रुग्णालयात दाखल

Deglur News : मराठवाडा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष बाबू बिरादार यांचे दुःखद निधन; धनगरवाडीत अंत्यसंस्कार

सोशल मीडियावरील घटस्फोटाच्या चर्चा खऱ्या की खोट्या? सौरभपासून वेगळं होण्यावर योगिता चव्हाणने दिली प्रतिक्रिया, काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT