subodh bhave gives reply to trollers who pointing his age and role in phulrani marathi movie sakal
मनोरंजन

Subodh Bhave: सुबोधतात्या वडील शोभतात फुलराणीचे.. नेटकऱ्याचा टिकेला सुबोध भावेनं दिलं फर्मास उत्तर

सुबोध भावेच्या आगामी 'फुलराणी' चित्रपटावर सध्या सडकून टीका होत आहे.

नीलेश अडसूळ

Subodh Bhave: गेली काही दिवस सुबोध भावेच्या 'फुलराणी'ची प्रचंड चर्चा होती. एका अजरामर नाट्य कृतीतून साकारला गेलेला हा चित्रपट कसा असेल, त्यात नायिका कोण असे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती.

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची नायिका समोर आली. या चित्रपट हास्यजत्रा मएफ अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर फुलराणीच्या भूमिकेत आहे. तर सुबोध भावेही महत्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच समोर आला. यावरून आता बऱ्याच उलटसुलट चर्चा होत आहे. काहींनी सुबोधच्या भूमिकेवर टीकाही केली आहे. पण सुबोधने मात्र याला सडेतोड उत्तर दिले आहे.

(subodh bhave gives reply to trollers who pointing his age and role in phulrani marathi movie)

नुकत्याच समोर आलेल्या ट्रेलर मध्ये दिसते की, प्रियदर्शनी एका फुलवालीच्या भूमिकेत आहे तर तिला सौंदर्यवती बनवण्याचा विडा सुबोध भावेने घेतलेला आहे. सुबोध भावे या चित्रपटात एक प्रोफेशनल ब्युटी कॉनटेस्ट ट्रेनर दाखवला आहे.

यामध्ये दोघांच्या वयात बरेच अंतर दिसत आहे, ते मूळ नाटकातही होते. मात्र या ट्रेलरवर एका युझरने सुबोधला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. सुबोधच्या भूमिकेवर त्याने टीका केली आहे. पण ऐकेल तो सुबोध कसला, सुबोधनेही त्याला जोरदार उत्तर देत सुनावले आहे.

फुलराणीच्या ट्रेलरवर एका युझरने सुबोध च्या भूमिकेवर कमेंट केली आहे.. ''सुबोध तात्या वडील शोभतात अगदी फुलराणीचे'' असे त्याने म्हंटले आहे. त्यावर सुबोधनेही त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. सुबोधने लिहिलं आहे की, ''तुलाच घेणार होते पण तू फार लहान वाटतोस. मुलगा वाटला असतास म्हणून मला घेतलं तिच्या वडिलांच्या वयाच्या भूमिकेसाठी''


सुबोधच्या या उत्तराने त्याची बोलती बंद झालीच शिवाय नेटकऱ्यांमध्ये या उत्तराची चांगलीच हवा झाली आहे. एकाने लिहिलं आहे की, 'वाह खुप छान उत्तर दिलंस' दुसऱ्याने लिहिलं, 'असं उत्तर देणं खूप गरजेचं होतं. ज्यांना कथानक, भूमिका आणि त्यासाठी लागणाऱ्या क्षमतेची गरज पाहून कास्टिंग केलं जातं हे समजत नाही त्यांच्यासाठी हे एकदम जबरदस्त उत्तर.'

सुबोधने आजवर अनेक दमदार चित्रपट केले आहे. 'फुलराणी' हाही त्याच्या ड्रीम प्रोजेक्ट मधला एक चित्रपट. हा चित्रपट येत्या २२ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT