Subodh Bhave Instagram
मनोरंजन

Subodh Bhave:'लहापणापासूनच ज्याच्या गोष्टी ऐकल्या..', शिवरायांनंतर सुबोध भावे साकारणार 'ही' ऐतिहासिक भूमिका

'हर हर महादेव' सिनेमावरनं रंगलेल्या वादानंतर सुबोध भावे ऐतिहासिक भूमिकांपासून लांब राहिल असं बोललं जात होतं.

प्रणाली मोरे

Subodh Bhave: सुबोध भावे म्हणजे मराठी इंडस्ट्रीतला एक सर्वगुणसंपन्न अभिनेता...आतापर्यंतच्या त्याच्या अभिनय कारकिर्दीवर नजर फिरवली तर त्यानं अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. जितका हिरो म्हणून तो लोकांना भावला तितकाच त्यानं रंगवलेला खलनायकही प्रेक्षकांना आवडला.

त्याच्या गंभीर भूमिका जितक्या मनाला स्पर्शून गेल्या तितकाच त्याच्यातील विनोदी नट हसवून गेला. 'बालगंधर्व'. 'डॉ.काशिनाथ घाणेकर' असे बायोपिक तर 'हर हर महादेव' मधनं साकारलेली ऐतिहासिक भूमिका..त्यानं प्रत्येक भूमिकेला कलाकार म्हणून न्याय दिला.

पण अशा अष्टपैलू कलाकारावर जेव्हा 'हर हर महादेव' सिनेमावरनं रंगलेल्या वादात सापडण्याची वेळ आली तेव्हा त्यानंही हात टेकले अन् म्हणाला,''बापजन्मात कुठल्या बायोपीकमध्ये काम करणार नाही''. अर्थात यानंतर त्याचे चाहते नक्कीच निराश झाले होते.

अनेकांना वाटलं शिवाजी महाराजांवरील सिनेमामुळे वाद रंगला म्हणजे सुबोध पुन्हा ऐतिहासिक भूमिकेच्या वाट्याला जाणार नाही.

पण आता पुन्हा सुबोध भावेनं एक पोस्ट करत आपण ऐतिहासिक भूमिकेत दिसणार असल्याची गूडन्यूज चाहत्यांना दिली आहे. (Subodh Bhave In Hindii web series Taj Divided by blood historic role)

सुबोध भावेनं पोस्टमध्ये लिहिलं आहे, ''लहापणापासूनच ज्याच्या गोष्टी ऐकल्या,ज्याच्या हुशारी वर प्रेम केलं त्या " बिरबल " ची व्यक्तिरेखा या आगामी वेब मालिके मध्ये साकारताना अत्यंत आनंद होतोय.
लवकरच काही दिवसात ही वेब मालिका तुम्हाला Zee 5 वर पाहता येईल''.

आता या पोस्टवरनं आपल्या सगळ्यांनाच कळालं असेल की सुबोध लवकरच बिरबलाची व्यक्तिरेखा साकारतोय अन् हिंदी वेबविश्वात त्याची घो़डदौड सुरु झाली आहे.

अद्याप सुबोधची ही नवी वेबसिरीज कधी प्रदर्शित होणार आहे हे सांगण्यात आलेलं नाही. पण सुोबध सोबतच हिंदीतील अनेक नामवंत कलाकार या सिरीजमध्ये दिसणार आहेत.

 ‘ताज : डिव्हायडेड बाय ब्लड’ असं सुबोधच्या या नव्या वेबसिरीजचं नाव आहे. एका दिमाखदार सोहळ्यात या सिरीजची घोषणा करण्यात आली. मुघल साम्राज्य,त्याच्यातील सत्तासंघर्ष आणि वारसा हक्कासाठी झालेले वाद या सिरीज मधून समोर येणार आहेत.

आता सुबोध भावे या सिरीजमध्ये बिरबल साकारणार असल्यानं नक्कीच त्याच्या मराठी चाहत्यामंध्येही या हिंदी वेबसिरीज संदर्भात उत्सुकता वाढली आहे. त्याचं अनेक चाहत्यांनी अभिनंदन केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Protest: कांद्याला भाव नाही, शेतकरी आक्रमक! पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेतलं ताब्यात, चांदवडमध्ये रस्त्यावर रणकंदन

Kolhapur VIP Service: कोल्हापूरसह परराज्यातील तरुणींकडून व्हिआयपी सर्व्हिस, म्हैसाळमधील आलिशान बारवर छापा; नशेत धुंद तरुणांना घेतलं ताब्यात

Supreme Court Dowry Harassment Ruling : सासरच्यांनी सुनेला जुळवून घेण्यास सांगितल्यास गुन्हा दाखल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

Mumbai: तिसऱ्या मुंबईला ग्रीनफिल्डचा बुस्टर, नवी मुंबई ते पुणे नव्या एक्सप्रेसवेचा मोठा लाभ होणार; काय आहे प्रकल्प ?

Ichalkaranji IPL Betting : ऑनलाईन ‘आयपीएल’ सट्टेबाजी, झटपट पैशाचा नाद इचलकरंजीतील तरूणांचा कारनामा, ५८ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT