Manapamaan Movie 
मनोरंजन

Subodh Bhave New Movie : सुबोध भावेनं केली नव्या चित्रपटाची घोषणा, ‘मानापमान!’

प्रसिद्ध मराठी अभिनेता सुबोध भावेनं त्याच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी दिली आहे.

युगंधर ताजणे

Manapamaan Movie : प्रसिद्ध मराठी अभिनेता सुबोध भावेनं त्याच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी दिली आहे. त्यानं नव्या चित्रपटाची घोषणा केल्याची पोस्ट इंस्टावरुन शेयर केली आहे. त्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केल्याचे दिसून आले आहे.

चित्रपट, नाटक, मालिका आणि वेबसीरिज सारख्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सुबोध भावेच्या नावाचा समावेश करावा लागेल. आता त्यानं त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ती पोस्ट करत शेयर करताना सुबोध म्हणतो की, जिओ स्टुडीओज् अभिमानाने सादर करत आहे, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या अजरामर नाटकावरून प्रेरित, शंकर-एहसान-लॉय यांची सांगितिक भेट, सुबोध भावे अभिनित - दिग्दर्शित, ‘मानापमान!’

मराठीतील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये सुबोधच्या नावाचा समावेश होतो. तसेच मराठीमध्ये सर्वाधिक बायोपिक करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये देखील सुबोधचे नाव घेतले जाते. त्यानं यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, बालगंधर्व, काशिनाथ घाणेकर, यांच्यावर आधारित चित्रपटांमध्ये त्यानं प्रभावीपणे आपली भूमिका वठवली आहे. याशिवाय त्याच्या कट्यार काळजात घुसली, हदयांतर, विजेता, वाळवी, या चित्रपटांना देखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

आता सुबोधच्या नव्या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर त्याच्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव करत त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सुबोधचा सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यापूर्वी त्यानं प्रसिद्ध अभिनेते नसिरुद्दीन शहा यांच्यासोबत ताज - डिव्हायडेड बाय ब्लड नावाच्या वेबसीरिजमध्ये देखील काम केले होते. त्यात त्यानं बिरबलाची भूमिका साकारली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरच्या फिंगरप्रिंट बघायच्या आहेत : राज ठाकरे

KDMC: परवानगी १४ मजल्यांची, बांधले २१ इमले; सात मजले बेकायदा, बिल्डरसह केडीएमसी अधिकाऱ्यांचे धक्कादायक कारनामे

Koyna Dam Water Release : कोयना धरणाचे सहा दरवाजे ६ फूटांनी उचलले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; ३३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

Ratnagiri Tourism : मिनी महाबळेश्वर' माचाळमधील प्रसिद्ध 'भिषाचा कडा' बनतोय धोकादायक! 'उलट्या धबधब्यावर' पर्यटकांचा जीव धोक्यात; तातडीने सुरक्षा भिंत उभारण्याची मागणी

1 August 2026 Horoscope : मकर अन् मिथुन राशीसाठी आजचा दिवस भाग्यशाली! पाहा 12 ही राशींचे आजचे भविष्य

SCROLL FOR NEXT