Subodh Bhave shared painful emotional post for veteran actor vikram gokhale  sakal
मनोरंजन

Subodh Bhave: सर.. मी तुम्हाला श्रध्दांजली देऊ शकत नाही.. सुबोध भावे हळहळला..

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनानंतर सुबोध भावेने काही आठवणी सांगितल्या आहेत.

नीलेश अडसूळ

vikram gokhale: मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे काल शनिवार 26 ऑक्टोबर रोजी निधन झाले. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते. वयाच्या 77 वर्षी त्यांचे निधन झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने शोकाकुल झालेले अनेक कलाकार आपल्या भावना व्यक्त करत आहेत. अशीच एक भावनिक पोस्ट अभिनेता सुबोध भावे याने केली आहे.

(Subodh Bhave shared painful emotional post for veteran actor vikram gokhale )

आजवर अनेक कलाकृतींच्या माध्यमातून सुबोधला विक्रम गोखले यांचा सहवास लाभला आहे. मग ते अनुमती सारखा चित्रपट असतो किंवा 'स्वामी प्रायवेट लिमितेट'.. सुबोध हा केवळ त्यांचा चाहता नव्हता तर त्याने अभिनयातल्या आणि जगण्यातल्या अनेक गोष्टी विक्रम गोखले यांच्याकडून आत्मसात केल्या होत्या. म्हणूनच त्यांच्या निधनाने सुबोध अत्यंत भावनिक झाला आणि या सर्व आठवणींना उजाळा देणारी एक पोस्ट त्याने शेयर केली.

सुबोध म्हणतो, ''विक्रम गोखले सर... ज्यांनी ज्यांनी मराठी कलाकृती श्रीमंत केली त्यातले तुम्ही एक महत्त्वाचे शिलेदार होतात. आयुष्यात पहिलं व्यावसायिक नाटक पाहिलं "संकेत मिलनाचा" ते तुमचं होतं.शाळेत असताना पाहिलं होत हे नाटक पण अजूनही तुमचं काम लख्ख आठवतंय. त्यानंतर तुमच्या पाहिलेल्या आणि तुमच्या अभिनयाची जादू अनुभवलेल्या कितीतरी व्यक्तिरेखा.''

पुढे लिहिले आहे की,''तुमच्या बरोबर अनेक कलाकृतींमध्ये काम करण्याची संधी मिळाली. "अनुमती" या चित्रपटासाठी तुम्हाला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार होता. त्यात आपला एक मोठा प्रसंग होता. खरतर तुम्ही त्या चित्रपटात आणि अभिनयात ही माझे बाप. पण त्या एका प्रसंगाची तुम्ही साधारण २० ते ३० वेळा तालीम केलीत. तुम्ही आम्हा प्रेक्षकांना बांधून टाकायचा. न बोललेल्या तुमच्या विरामांमध्येही केवढी अर्थता होती.''

''शेवटपर्यंत काम करत राहिलात.शेवटच्या क्षणी सुध्दा तुम्ही नक्की नवीन भूमिकेचा विचार करत असाल याची खात्री आहे. ही भूमिका कदाचित आम्हाला सोडून जायची असेल.... पण आम्ही याला तुमचा तुमच्या पद्धतीने घेतलेला "विराम" समजू. तुम्हाला श्रध्दांजली नाही देऊ शकत. हो पण तुमच्या विरामानंतर येणाऱ्या पुढच्या शब्दाची आणि अर्थात तुमच्या "एन्ट्री" ची नक्की वाट पाहत राहू. तोपर्यंत जिथे असाल तिथे आनंदी रहा,शांत रहा. तुमच्यावर आणि तुमच्यातील कलेवर नितांत प्रेम करणारा तुमचा चाहता... सुबोध भावे'' अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT