मनोरंजन

मराठी चित्रपटांचा यशाचा चौकार

काजल डांगे

मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘नाळ’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ या चारही चित्रपटांनी यशाचा चौकार मारला. या चित्रपटांनी महिनाभरातच एकूण ५० ते ६० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. या चित्रपटांच्या यशामुळे मराठी चित्रपटांच्या निर्मितीला आणखी वेग येईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट ८ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. ‘नाळ’ १६ नोव्हेंबरला, ‘मुळशी पॅटर्न’ २३ नोव्हेंबरला आणि ७ डिसेंबरला ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

या चारही चित्रपटांनी बॉक्‍स ऑफिसवर जोरदार मुसंडी मारत हिंदी चित्रपटांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. दमदार कथानक, उच्च निर्मितीमूल्ये, कसदार अभिनय यामुळे या चित्रपटांनी प्रेक्षकांना आकर्षित केले. ‘नाळ’ व ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटांनी आतापर्यंत २० कोटींहून अधिक उत्पन्न मिळविले आहे. ‘मुळशी पॅटर्न’ने आतापर्यंत १३ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ या चित्रपटाने तीन दिवसांत चार कोटी रुपयांची कमाई केली आहे. 

या यशाच्या आधारावर आपण पुढील वर्ष सुरक्षित करायला हवे. त्यासाठी सर्व निर्मात्यांनी एकत्र आले पाहिजे. चित्रपटांच्या तारखा क्‍लॅश होणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. आशय चांगला असेल, तर मराठी प्रेक्षक चित्रपट उचलून धरतो. हिंदी चित्रपटांपेक्षा आज आपण सरस ठरलो आहोत, याचे कारण हेच आहे.
- सतीश राजवाडे, दिग्दर्शक, ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’

या चारही चित्रपटांचे विषय वेगळे आहेत. त्यातील दोन चित्रपटांमागे मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या आहेत. हे सर्व चित्रपट उत्तम चालले. एकाच महिन्यात चार चित्रपट यशस्वी होणे, ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी पहिलीच वेळ आहे. ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाने वेगळा प्रेक्षकवर्ग खेचून आणला. हा मराठी प्रेक्षकांचा विजय आहे. 
- प्रवीण तरडे, दिग्दर्शक,  ‘मुळशी पॅटर्न’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hidu Rashtra: भारत हिंदुराष्ट्र कधीपर्यंत होणार? डेडलाईन आली; शंकराचार्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं

तुलसी २.० ची पहिली झलक- ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी २’चा नॉस्टॅल्जिया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

Video : क्षणभराच्या रागात गेला जीव! निर्दयी माणसानं किरकोळ भांडणात तरुणाला धावत्या रेल्वेतून ढकललं; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील रामवाडीमध्ये पेट्रोल चोराने जाळल्या सहा मोटरसायकल

'चला हवा...'मध्ये निलेशच्या जागी अभिजीतच्या दिसण्यावर श्रेया बुगडेची प्रतिक्रिया; म्हणाली- तुला एकच गोष्ट सांगायला आवडेल की...

SCROLL FOR NEXT