suchitra bandekar ukhana video viral for husband adesh bandekar  SAKAL
मनोरंजन

Suchitra Bandekar Video: कधी आपल्याही घरी येत चला.. सुचित्रा वहिनींनी बांदेकरांसाठी घेतला उखाणा, व्हिडिओ व्हायरल

आदेश भावजींची बायको म्हणजेच सुचित्रा बांदेकर यांच्याकडून फॅन्सनी उखाणे बोलवून घेतले

Devendra Jadhav

Suchitra Bandekar Ukhana Video: आदेश बांदेकर म्हणजे तमाम महाराष्ट्राचे लाडके भावजी. आजवर हजारो वहिनींना पैठणी देऊन आदेश भावजींनी महाराष्ट्रातल्या तमाम वहिनींना खुश केलंय.

गेली अनेक वर्ष आदेश बांदेकर होम मिनिस्टर शोच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत.

आदेश बांदेकर महाराष्ट्रातील तमाम वहिनींच्या तोंडून उखाणे बोलावून घेतात. अशातच आदेश भावजींची बायको म्हणजेच सुचित्रा बांदेकर यांच्याकडून फॅन्सनी उखाणे बोलवून घेतले.

(suchitra bandekar ukhana video viral for husband adesh bandekar)

सुचित्रा बांदेकर सध्या बाईपण भारी देवा सिनेमात अभिनय करणार आहेत. हा सिनेमा लवकरच रिलीज होतोय. सुचित्रा सध्या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहेत.

एका कार्यक्रमात महिलावर्गाकडून सुचित्रा बांदेकर यांना उखाणा बोलण्याची फर्माईश करण्यात आली. त्यावेळी सुचित्रा यांनी तमाम महिलावर्गाच्या म्हणण्याचा मान राखत आदेश बांदेकर यांच्यासाठी खास उखाणा म्हटला.

सुचित्रा यांनी हातात माईक धरला आणि उखाणा घेताना म्हणाल्या. “दार उघड बये दार उघड म्हणणारा आदेश आहे तसा भला, दार उघड बये दार उघड म्हणणारा आदेश आहे तसा भला, बांदेकर उभ्या महाराष्ट्रभर फिरता, कधी-मधी आपल्याही घरी येत चला”,

असा उखाणा सुचित्रा वहिनींनी घेतलाय. या उखाण्यावर उपस्थित महिलावर्गाकडून टाळ्यांचा कडकडाट झाला.

दरम्यान सुचित्रा बांदेकरचा बाईपण भारी देवा सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते,सुकन्या मोने,शिल्पा नवलकर,सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अशा मातब्बर अभिनेत्री एकत्र पडद्यावर पाहण्याचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे.

'बाईपण भारी देवा' हा एक कौटुंबिक चित्रपट असून प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करण्यासाठी ३० जून,२०२३ रोजी चित्रपटगृहात आपल्या भेटीस येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे यांच्या भेटीला अभिजीत दिपके, सरकारवर हल्लाबोल

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT