Sudha Chandran  Instagram/Sudha Chandran
मनोरंजन

सुधा चंद्रन यांना कृत्रिम पायामुळे विमानतळावर रोखलं; अखेर मोदींकडे विनंती

केंद्र आणि राज्य सरकारकडे सुधा चंद्रन यांची कळकळीची विनंती

स्वाती वेमूल

केंद्र आणि राज्य सरकारकडे सुधा चंद्रन यांची कळकळीची विनंती

प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना सुधा चंद्रन Sudha Chandran यांना गेल्या अनेक वर्षांपासून विमानतळावरील सुरक्षा तपासणीदरम्यान समस्यांचा सामना करावा लागतोय. सुधा चंद्रन यांनी काही वर्षांपूर्वी एका अपघातात आपला एक पाय गमावला होता. त्यानंतर कृत्रिम पाय लावत त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र जेव्हा कधी त्यांना प्रवास करावा लागतो, तेव्हा विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान त्यांना त्यांचा कृत्रिम पाय काढण्यास सांगितला जातो. असं अनेकदा झाल्यामुळे अखेर सुधा यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपली व्यथा सांगितली.

"ही अतिशय वैयक्तिक बाब आहे, जी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगू इच्छिते. केंद्र आणि राज्य सरकारकडे ही माझी विनंती आहे. मी अभिनेत्री आणि डान्सर सुधा चंद्रन आहे. कृत्रिम पायाने नृत्य करत मी इतिहास रचला आणि माझ्या देशाला माझ्यावर अभिमान वाटावा असं काम केलं. पण जेव्हा कधी मी माझ्या कामानिमित्त बाहेर जाते, तेव्हा नेहमी मला विमानतळावर रोखलं जातं. जेव्हा मी सुरक्षारक्षक आणि सीआयएसएफ अधिकाऱ्यांना विनंती करते की कृपया माझ्या कृत्रिम पायासाठी ईटीडी टेस्ट करा, तेव्हा ते मला माझा कृत्रिम पाय काढून दाखवण्यास सांगतात. मोदीजी, हे खरंच शक्य आहे का? एक महिला दुसऱ्या महिलेला अशी वागणूक देते का? मी तुम्हाला विनंती करते की ज्याप्रकारे ज्येष्ठ व्यक्तींना कार्ड देतात, त्याप्रकारे माझ्यासारख्या लोकांसाठीही काहीतरी व्यवस्था करावी", असं त्या व्हिडीओत म्हणाल्या. सुधा चंद्रन यांच्या या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. करणवीर बोहरा, अदा खान आणि इतर कलाकारांनीही याबद्दल निराशा व्यक्त केली आहे.

सुधा चंद्रन यांनी वयाच्या साडेतीन वर्षापासून नृत्याचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली होती. एकेदिवशी कुटुंबीयांसोबत बसने प्रवास करताना त्यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या एका पायाला गंभीर दुखापत झाली. नंतर त्याच पायाला गँगरीन झाल्याने तो कापावा लागला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Open or Closed Update: अनंत चतुर्थीला महाराष्ट्रात बँका सुरू की बंद? RBI कडून मोठी अपडेट

Nandigram By-Election Symbol Controversy : निवडणूक आयोगाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर; 183 चिन्हं असताना 'लिफाफा' वरच वाद का? हायकोर्टानं कोणाला सुनावलं?

Thane Water Supply: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! २४ तास पाणीकपात, कोणत्या भागांना फटका?

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Rare Otters in Sangli : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! कृष्णा नदीपात्रात पहिल्यांदाच आढळला दुर्मिळ पाणमांजरांचा कळप; 8 ते 9 पाणमांजरं दिसली एकत्र

SCROLL FOR NEXT