मनोरंजन

Sudhir Phadke: प्रसिद्ध गायक, संगीतकार सुधीर फडके यांच्यावर 'बायोपिक'! कोण साकारणार 'बाबूजी'?

सुधीर फडके यांच्या आयुष्यावर बायोपिकची निर्मिती केली जाणार असून त्याचे नाव स्वरगंधर्व सुधीर फडके असे आहे.

युगंधर ताजणे

Sudhir Phadke Biopic : मराठी साहित्यातील ज्येष्ठ कवी ग.दि.माडगुळकर रचित गीतरामायणाला स्वरसाज देणाऱ्या प्रसिद्ध गायक आणि संगीतकार सुधीर फडके यांच्याविषयी आनंदाची बातमी समोर आली आहे. गीतरामायणाला वेगळी उंची सुधीर फडके उर्फ बाबूजींच्या संगीतानं मिळाली. गीतरामायणाचे महाराष्ट्रात शेकडो कार्यक्रम झाले. त्यातून बाबूजींना श्रोत्यांची प्रचंड लोकप्रियता मिळाली.

सुधीर फडके यांच्या आयुष्यावर बायोपिकची निर्मिती केली जाणार असून त्याचे नाव स्वरगंधर्व सुधीर फडके असे आहे. या चित्रपटाच्या मुहूर्ताला नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात कार्यक्रम पार पडला. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते त्या मुहूर्ताचा प्रारंभ करण्यात आला. सुधीर फडके हे मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध संगीतकार आणि लोकप्रिय गायक होते.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

सुधीर फडके यांना स्वरगंधर्व म्हणूनही ओळखले जाते. त्यांचा जन्म २५ जुलै १९१९ रोजी कोल्हापूरमध्ये झाला. त्यांनी सुरुवातीला कोल्हापूरमधील वामनराव पाध्ये यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. त्यांचे जन्मनाव राम फडके असे होते. त्यानंतर त्यांनी नाव बदलून सुधीर असे ठेवले. मराठी संगीत विश्वामध्ये त्यांना बाबूजी या नावानं ओळखले गेले. १९४१ मध्ये त्यांनी एचएमव्हीसोबत करिअरला सुरुवात केली.

१९४६ मध्ये बाबूजींनी प्रभात फिल्म कंपनीच्या गोकूळ चित्रपटापासून संगीत दिग्दर्शक म्हणून सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या जीवनकाळात १११ चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले. त्यात काही हिंदी चित्रपटांचा देखील समावेश आहे. प्रसिद्ध गीतकार ग.दि.माडगुळकर यांच्यासोबत ओळख झाल्यानंतर त्यांनी गीतरामायण कार्यक्रमाची बांधणी करुन तो कार्यक्रम महाराष्ट्रात सादर केला. त्याला प्रेक्षकांचा, श्रोत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. भारताबरोबरच परदेशातही त्याचे विविध कार्यक्रम पार पडले.

बाबूजींनी स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती केली होती. २९ जुलै २००२ रोजी ब्रेन हॅमरेजमुळे बाबूजींचे निधन झाले. आता प्रसिद्ध दिग्दर्शक योगेश देशपांडे हे बाबूजींच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. त्यात प्रसिद्ध अभिनेता सुनील बर्वे हे सुधीर फडके यांची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT