Suhana Khan Amitabh Bachchan Big B KBC Show shah rukh khan  esakal
मनोरंजन

Kaun Banega Crorepati 15: केबीसीत शाहरुखवरुन सुहानाला विचारला प्रश्न, पोरगी चुकली! अमिताभ यांचा डोक्याला हात

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख हा सध्या वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचा जवान नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

युगंधर ताजणे

Suhana Khan Amitabh Bachchan Big B KBC Show shah rukh khan : बॉलीवूडचा किंग खान शाहरुख हा सध्या वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचा जवान नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानं हजार कोटींची कमाई करुन वेगळा विक्रम आपल्या नावावर केला होता. यानंतर आता त्याचा डंकी नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्यासाठी शाहरुख प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

या सगळ्यात शाहरुखची लाडकी लेक सुहाना खान देखील लाईमलाईटमध्ये आहे. सुहानाचा पहिला चित्रपट द आर्चीज प्रदर्शित झाला आहे. त्याची चर्चा आहे. यामध्ये सुहाना खान, खूशी कपूर आणि अगस्त्य नंदा यांच्या भूमिका आहेत. त्यामुळे सेलिब्रेटी विश्वात त्याची चर्चा आहे. द आर्चीजच्या निमित्तानं सुहाना त्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केबीसीमध्ये गेली होती. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

सुहाना ही नेहमीच तिच्या बोल्डनेस फोटोसाठी चर्चेत असते. तिच्या त्या फोटोंवर मिळणाऱ्या प्रतिक्रियाही भन्नाट असतात. सोशल मीडियावर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अशात सुहानाचा पहिला डेब्यू मुव्ही प्रदर्शित होणं आणि त्याची चर्चा सुरु असणे यामुळे सुहाना सध्या ट्रेडिंगचा विषय राहिली आहे. ती बिग बी अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती नावाच्या शो मध्ये गेली होती. त्यावेळी अमिताभ यांनी तिला विचारलेला तो प्रश्न सुहानासाठी डोकेदुखी ठरला आहे.

त्याचं झालं असं की, अमिताभ यांनी सुहानाला तिच्या वडिलांवरुन प्रश्न विचारला. यावेळी त्या शो मध्ये द आर्चीजच्या दिग्दर्शक झोया अख्तर देखील उपस्थित होत्या. शाहरुखला पद्मश्री मिळाला आहे किंवा नाही, असा तो प्रश्न होता. त्याचं उत्तर सुहानाला देता आलं नाही. त्यामुळे ती ट्रोल होत आहे.

प्रश्न असा होता की, यापैकी कोणत्या पुरस्कारानं शाहरुखला गौरविण्यात आलेलं नाही, त्याला पर्याय होते - १. पद्मश्री, २. लिजन ऑफ ऑनर, ३. एल इटिओल डी, ४. वॉल्पी कप यावर सुहानानं कुठलाही विचार न करता थेट पद्मश्री असं सांगून टाकलं. ते उत्तर ऐकल्यानंतर अमिताभ बच्चन यांना तर धक्काच बसला. वेदांग तर म्हणाला, तू या प्रश्नाचे चुकीचं उत्तर कसं काय देऊ शकतेस?

हे उत्तर ऐकल्यानंतर अमिताभ यांनी सुहानाची थट्टा उडवली. ते म्हणाले मुलीलाच माहिती नाही की, वडिलांना कोणते पुरस्कार मिळाले आहेत ते.. वास्तविक त्या प्रश्नाचं उत्तर वॉल्पी कप असं आहे. सुहानानं द आर्चिजमध्ये वेरोनिकाची भूमिका साकारली असून त्यात बिग बी यांचा नातू अगस्त्य आणि बोनी कपूर, श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर यांनी भूमिका केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Car Bomb Attack : आमदार शौकत मोल्ला यांच्या कारवर बॉम्ब हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ!

T20 World Cup Group 2 Standing: इंग्लंडच्या विजयाने सुपर ८ च्या गटात मोठा उलटफेर; श्रीलंकेसह पाकिस्तानचंही वाढलं टेंशन; जाणून घ्या उपांत्य फेरीचं समीकरण

Latest Marathi News Live Update : दक्षिण मुंबईतील कोस्टल रोडजवळ भीषण आग

Missing Link project: मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सुरू होताच टोल दरात बदल होणार का? नवीन नियम काय? महत्त्वाची माहिती आली समोर

T20 WC, IND vs SA: अक्षर पटेलला संधी नाहीच; दक्षिण आफ्रिका संघात तब्बल ४ बदल; Super-8 सामन्यासाठी पाहा भारताची प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT