Suhana Khan and Agastya Nanda  Sakal
मनोरंजन

Suhana Khan :बिग बीं च्या नातूच्या प्रेमात किंग खानची लेक; कुटुंबीयांसमोर रिलेशनशिप केलं...

आर्यन खानचे नाव नोरा फतेहीसोबत जोडल्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहानाच्याही बातम्या येत आहेत. दोघेही द आर्चीजमध्ये एकत्र काम करणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडमध्ये अफेअर, रिलेशनशिप, प्रेम आणि लग्न हे 2023 चा ट्रेंडिंग विषय असणार आहेत. लग्नाच्या बातमीने वर्षाची सुरुवात होत आहे. अशा परिस्थितीत आर्यन खानचे नाव नोरा फतेहीसोबत जोडल्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहानाच्याही बातम्या येत आहेत.

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हिला डेट करत असल्याची बातमी आहे. दोघेही 'द आर्चीज' या चित्रपटामध्ये एकत्र काम करणार आहेत. कपूर कुटुंबाने अलीकडेच ख्रिसमस पार्टीचे आयोजन केले होते ज्यात अगस्त्य नंदा आणि सुहाना खान दिसले होते. अगस्त्य हा राज कपूर यांची मुलगी रितू नंदा यांचा नातू आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अगस्त्याने सुहानाची तिच्या कुटुंबियांशी जोडीदार म्हणून ओळख करून दिली आहे. द आर्चीजच्या सेटपासून दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. अशा परिस्थितीत दोघांचे नाते हळूहळू घट्ट होत गेले. सुहाना आणि अगस्त्य दोघेही एकमेकांसोबत बराच वेळ घालवतात. तसेच ते त्यांचा बाँड लपवण्याचा प्रयत्नही करत नाहीत.

सुहाना श्वेता नंदालाही खूप आवडते आणि श्वेताचा दोघांच्याही नात्यावर कुठलाच आक्षेप नाही. दरम्यान, अगस्त्य आणि सुहानाच्या अफेअरच्या चर्चा होत असल्या तरी श्वेताने किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे सेटवरचा या दोघांचा बाँड फक्त मैत्रीच आहे की त्या पलीकडे आहे, हे येत्या काळातच कळेल.

तसे, सुहाना अगस्त्याची बहीण नव्या नंदाची ही मैत्रीण आहे आणि दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. नव्याचे नाव सध्या गहराइयां फेम सिद्धांत चतुर्वेदीसोबत जोडले जात आहे. दोघेही अनेकदा क्वालिटी टाइम घालवताना दिसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT