suhana khan and shah rukh khan Sakal
मनोरंजन

Suhana Khan On Pathaan: 'पप्पा तुस्सी ग्रेट हो'... 'पठाण' च्या यशावर भारावली सुहाना खान

यशराज फिल्म्सच्या या स्पाय युनिव्हर्स सिनेमाला बॉक्सऑफिसवर उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ डिजिटल टीम

सुपरस्टार शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाने बॉलीवूड इंडस्ट्रीच्या इतिहासातील सर्वात मोठा ओपनिंग डे रेकॉर्ड केला आहे. यशराज फिल्म्सच्या या स्पाय युनिव्हर्स सिनेमाला बॉक्सऑफिसवर उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहाना खानने पठाण चित्रपटाच्या यशाबद्दल एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

सुहाना खानने इन्स्टा स्टोरीवर पूजा ददलानीची इन्स्टाग्राम पोस्ट रीशेअर केली आहे, ज्यामध्ये 'पठाण'च्या कलेक्शनची माहिती आहे. चित्रपटाच्या पोस्टरसोबत लिहिले आहे, 'हिंदी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात मोठी ओपनिंग. पहिल्या दिवशी पठाण चित्रपटाचे वर्ल्डवाइड ग्रॉस कलेक्शन 106 कोटी रुपये. ही पोस्ट शेअर करत सुहानाने कॅप्शनमध्ये अश्रू असलेला इमोजी पोस्ट केला आहे. अशा प्रकारे वडील शाहरुखच्या या यशामुळे ती खूप भावूक झाल्याचं सुहानाने सांगितलं.

शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५५ कोटींची कमाई केली असून हा एक ऐतिहासिक विक्रम आहे. या आकड्यात तमिळ आणि तेलुगू व्हर्जनच्या कमाईचाही समावेश आहे. अर्ली ट्रेड्सनुसार, पठाण चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 65 कोटींची कमाई केली आहे. यासोबतच चित्रपटाच्या एकूण कमाईचा आकडा अवघ्या दोन दिवसांत 122 कोटींच्या पुढे गेला आहे.

suhana khan

शाहरुख खानने तब्बल चार वर्षानंतर पठाण चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर दमदार पुनरागमन केले आहे. या स्पाय थ्रिलर चित्रपटात शाहरुखशिवाय जॉन अब्राहम, दीपिका पदुकोण, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया यांसारख्या कलाकारांनी काम केले आहे. विशेष म्हणजे सलमान खानने 'पठाण'मध्ये कॅमिओ केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद असून त्यांनी 'वॉर' आणि 'बँग बँग' सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War Ceasefire: ''इराणने अमेरिकेवर डागलेल्या शंभराहून अधिक मिसाईल्स पाकिस्तानी'', शांतिदूत समजणाऱ्या पाकचे निघाले वाभाडे

लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन..! Rohit Sharma लवकरच Netflix च्या चित्रपटात झळकणार? माजी कर्णधारने दिले संकेत...

Khed Karanjavihire road safety: खेंगलेवस्ती परिसरात उघडी विहीर, वाढत्या वाहतुकीत दुर्घटनेचा धोका; प्रशासन व जागा मालक सुस्त

मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे?

Bhandup Hospital MNS Protest : मुंबईत 19 वर्षीय तरुणीवर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याकडून जबरदस्ती, मनसेचा आरोप, कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT