Suhana Khan And Shah rukh Khan Google
मनोरंजन

Suhana Khan नं शेअर केले हॉट फोटो पण लाइमलाइट लुटली पप्पा शाहरुखच्या कमेंटनं..मुलीची पोलखोल करत म्हणालाय..

शाहरुख खाननं सुहाना खानच्या फोटोंवर केलेल्या कमेंटनं सध्या सोशल मीडियावर एकच हशा पिकला आहे.

प्रणाली मोरे

Suhana Khan :शाहरुख खान सिनेमातील आपल्या अभिनयासाठी आणि त्याहून खास सिनेमातील रोमॅंटिक अंदाजासाठी अधिक ओळखला जातो. त्याचसोबत त्याला त्याच्या सेन्स ऑफ ह्युमरसाठी आणि मजेदार कमेंट्स करण्यासाठी देखील ओळखलं जातं. आता याचा दाखला कुठल्या मुलाखतीतून नाही सोशल मीडियावरच मिळाला आहे.

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान लवकरच नेटफ्लिक्सच्या सिनेमातून मनोरंजन विश्वात पदार्पण करणार आहे. सोशल मीडियावर सुहाना खान भलतीच सक्रिय पहायला मिळते. सुहानानं नुकतेच इन्स्टाग्रामवर आपले काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत,ज्यात ती खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

सुहानाचे हे फोटो खूप सुंदर आहेत यात शंकाच नाही पण तरी लोकांचं लक्ष मात्र फोटो सोडून दुसरीकरडे लागून राहिलं आहे. सुहानाच्या या पोस्टवर तिचे वडील म्हणजे शाहरुख खाननं कमेंट केली आहे ,ज्यानं पूर्ण लाइमलाइट आपल्याकडे वळवली आहे. चला पाहूया,शाहरुखनं नेमकी अशी काय कमेंट केली आहे.

आपल्या माहितीसाठी इथे सांगतो की सुहाना खाननं नुकतेच तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. तीन फोटोपैकी एका फोटोत सुहानानं एक डीप वी नेकवाला टाइट ब्लॅक गाऊन घातला आहे आणि आपल्या फिगरला फ्लॉन्ट करताना ती दिसत आहे.

दुसऱ्या फोटोत सुहानाने पिंक रंगाचा ड्रेस घातला आहे आणि आपली आई व शनाया कपूरसोबत उभी दिसत आहे. तिसऱ्या फोटोत सुहानानं तोच शॉर्ट पिंक रंगाचा ड्रेस घातला आहे आणि त्यात ती खूपच हॉट व बोल्ड पोझ देताना दिसत आहे.

हेही वाचा: ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी

या पोस्टमधील फोटोत सुहाना खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत असली तरी लाइमलाइट पूर्ण शाहरुख घेऊन गेला त्यावर कमेंट करून. शाहरुखनं लिहिलं आहे-''खूपच सुंदर दिसत आहे माझी मुलगी...घरात जे तू दिवसभर तो पजामा घालून फिरत असतेच,हा त्याच्यापेक्षा खूपच वेगळा लूक आहे''.

शाहरुखच्या या कमेंटला अनेकांनी लाइक्स केलं आहे. हे वाचून अनेकांना आपलं हसूही आवरता येईना. या कमेंटसाठी सुहानानं आपल्या वडलांना म्हणजे शाहरुख खानला थॅंक्स म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT