Suhana Khan Shah Rukh Daughter The Archies  e
मनोरंजन

Suhana Khan The Archies : 'सुहानानं अ‍ॅक्टिंग केली असं कसं म्हणायचं'? शाहरुखच्या लेकीची नेटकऱ्यांनी घेतली शाळा!

बॉलीवूडचा किंग खान शाहरुखची लाडकी लेक सुहाना, बिग बी अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य अन् श्रीदेवी-बोनी कपूर यांची मुलगी खुशी यांच्या बॉलीवूड डेब्यूची चर्चा रंगली आहे.

युगंधर ताजणे

Suhana Khan Shah Rukh Daughter The Archies Movie : बॉलीवूडचा किंग खान शाहरुखची लाडकी लेक सुहाना, बिग बी अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य अन् श्रीदेवी-बोनी कपूर यांची मुलगी खुशी यांच्या बॉलीवूड डेब्यूची चर्चा रंगली आहे. या सगळ्यांनी प्रसिद्ध दिग्दर्शिका झोया अख्तर यांच्या द आर्चीजमधून डेब्यू केले आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका बड्या थिएटरमध्ये झालेल्या द आर्चिजच्या स्क्रिनिंगला बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. बिग बी अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या रॉय, अमिताभ यांची मुलगी श्वेता बच्चन तसेच शाहरुख खान, गौरी खान, आर्यन खान, ऋतिक रोशन त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद यांनी हजेरी लावली होती.

या सगळ्यात द आर्चिज पाहिल्यानंतर नेटकऱ्यांच्या आलेल्या प्रतिक्रियांनी मेकर्स आणि कलाकार यांना चांगलेच धारेवर धरले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अनेकांचे लक्ष सुहाना खानकडे होते. मात्र तिनं चित्रपटातून नाराजी केल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. तिला ना अभिनय जमला आहे ना डान्स. तिच्या चेहऱ्यावर कुठलेच एक्सप्रेशन नाहीत. अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे.

अमिताभ बच्चन यांचे नातू अगस्त्य नंदा याला थोड्याफार प्रमाणात अभिनय जमला आहे. त्यानं काही अंशी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. बाकीच्या कलाकारांनी साफ निराशा केली आहे. सेलिब्रेटी किड्सकडून नेहमीच प्रेक्षकांना मोठी अपेक्षा असल्याचे दिसून आले आहे. अशावेळी काही दिवसांपासून झोया अख्तरच्या द आर्चीजची चर्चा रंगली होती.

सुहाना खान, अगस्त्य नंदा, मिहिर अहुजा, वेदांग रैना, युवराज मेंडा या नवोदित कलाकारांनी या चित्रपटाच्या माध्यमातून डेब्यू केले आहे. या सगळ्यात किंग खानची लेक सुहाना खान सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. तिनं अभिनयाचा प्रयत्न केला आहे मात्र तिला तो जमलेला नाही. अशा शब्दांत नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT