sukanya kulkarni mone and sanjay mone wedding incidence they forgot to catch picture together sakal
मनोरंजन

Sukanya Kulkarni Mone Birthday: स्वतःच्याच लग्नात फोटो काढायला विसरले सुकन्या-संजय.. भन्नाट किस्सा!

अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने जाणून घेऊया हा खास किस्सा..

नीलेश अडसूळ

नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपली छाप पडून रसिकांना आपलंसं करणारी अभिनेत्री म्हणजे सुकन्या कुलकर्णी मोने. सुकन्या यांनी आजपर्यंत अनेक नाटक, मालिका या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सध्या त्या झी मराठीवरील 'अगं अगं सासूबाई.. काय म्हणता सूनबाई' या मालिकेत सासूच्या खट्याळ भूमिकेत आहेत. मराठी मनोरंजन विश्वात सुकन्या आणि संजय ही लोकप्रिय जोडी आहे. नाटक करता करता प्रेम आणि मग लग्न असा संजय आणि सुकन्या मोने यांचा प्रवास आहे. आज सुकन्या ताईंचा वाढदिवस, त्या निमित्ताने त्यांच्या लग्नातील एक भन्नाट किस्सा जाणून..

(sukanya kulkarni mone and sanjay mone wedding incidence they forgot to catch picture together)

संजय आणि सुकन्या यांची ओळख ही `ती फुलराणी' या नाटकाच्या दरम्यान झाली. सुरुवातीला ते फार औपचारिकरित्या वागत असत. एकमेकांना ते `संजय सर' आणि `सुकन्या मॅम' अशी हाक मारत. नंतर ही औपचरीतका दूर झाली आणि मैत्री वाढू लागली. पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. पण बराच उशिराने लग्नाचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेकांना त्यांचं दुसरं लग्न आहे की काय असंही वाटत होतं.

दोघांनीही अत्यंत पारंपरिक पद्धतीने आणि थाटात लग्न केलं. यावेळी मनोरंजन विश्वातील बऱ्याच मित्रमैत्रिणींनी हजेरी लावली होती. सुकन्या आणि संजय हे सर्वांमध्येच पाहिल्या पासून प्रचंड लोकप्रिय असल्याने लग्नाला खूप माणसं आली. विशेष म्हणजे प्रत्येकासोबत सुकन्या आणि संजयने फोटो काढले. पण या गडबडीत ते एकमेकांसोबतच फोटो काढायचे विसरले. लग्नानंतर जेव्हा एका मालिकेसाठी त्यांच्या लग्नाचा फोटो हवा होता, त्यावेळी आपण एकमेकांसोबत फोटोच काढला नसल्याचे लक्षात आले. त्या दोघांचा एकत्र असा केवळ एक फोटो सापडला. असा भन्नाट किस्सा त्यांच्या लग्नात घडला होता.

सुकन्या यांच्या विषयी बोलावं तेवढ कमीच आहे. यांनी साकारलेल्या आईच्या भूमिकांमुळे त्यांनी चाहत्यांच्या मनामध्ये अढळ स्थान निर्माण केलेले आहे. 'आभाळमाया', 'जुळून येती रेशीमगाठी', 'चूकभूल द्यावी घ्यावी', 'घाडगे अँड सून' आणि अशा कितीतरी मालिका त्यांच्या सशक्त अभिनयाने लोकप्रिय झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate will be arrest : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : साई चरणी २० लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; साईभक्ताचा संस्थानकडून सन्मान

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT