Sukesh Chandrashekhar and Nikki Tamboli case news  Sukesh Chandrashekhar and Nikki Tamboli case news
मनोरंजन

Sukesh Chandrasekhar : निक्की, सोफियाने तिहार तुरुंगात सुकेशची घेतली दोनदा भेट

टीम दोन्ही अभिनेत्रींना घेऊन तिहार तुरुंगात गेली होती

सकाळ डिजिटल टीम

Sukesh Chandrashekhar and Nikki Tamboli case news दिल्ली पोलिसांच्या तपासात सुकेश चंद्रशेखरशी (Sukesh Chandrasekhar) संबंधित नवीन सत्य बाहेर येत आहे. सुकेशची निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि सोफिया सिंगसोबत (Sophiya Singh) तुरुंगात दोनदा भेट झाली होती. आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात ही बाब समोर आली आहे. त्याचवेळी पोलिस दोन्ही अभिनेत्रींना घेऊन तिहार जेल क्रमांक एकमध्ये गेले. येथे त्यांनी सुकेशची भेट घेतलेली खोली दाखवली.

टीम दोन्ही अभिनेत्रींना घेऊन तिहार तुरुंगात गेली होती. निक्की (Nikki Tamboli) आणि सोफिया दिवसा सुकेशला (Sukesh Chandrasekhar) भेटायला जायच्या. सुकेशच्या प्रभावामुळे अभिनेत्री भेटायला आल्याची कोणतीही नोंद नाही. दोन्ही अभिनेत्रींनी टीमला सुकेशच्या खोलीत नेले. यावेळी कारवाईची व्हिडिओही तयार करण्यात आला, असे आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

दक्षिण भारतीय चॅनलचा प्रमुख असल्याचे सांगून सुकेशने अभिनेत्रींना चित्रपटात भूमिका देण्याचे आश्वासन दिले होते. चौकशीत सुकेशने त्यांना तीन लाख दिल्याचेही निष्पन्न झाले. सुकेश तुरुंगातून टोळी चालवत होता. यामध्ये पोलिस अधिकाऱ्यांचा सहभाग समोर आला आहे, असे स्पेशल सीपी रवींद्र यादव यांनी सांगितले.

कोणालाही क्लीन चिट मिळालेली नाही

बॉलिवूडमधील आणखी काही अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. ज्या सुकेशच्या संपर्कात होत्या. खरं तर गेल्या वर्षी मे-जूनमध्ये पॅरोलदरम्यान सुकेश अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना भेटला होता. आतापर्यंतच्या चौकशीत कोणालाही क्लीन चिट मिळालेली नाही, असे स्पेशल सीपी रवींद्र यादव यांनी सांगितले.

आठ कोटींची कागदपत्रे सापडली

सुकेशकडून मिळालेल्या भेटवस्तूंची यादी जॅकलीन फर्नांडिसने पोलिसांना दिली. सुकेशने जॅकलीन आणि कुटुंबीयांना सुमारे आठ कोटींच्या भेटवस्तू दिल्या. ही सर्व कागदपत्रे जॅकलीनकडून मागविण्यात आली होती. तपासात सर्व बरोबर असल्याचे आढळले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जॅकलीनला सुकेशची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहीत होती की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस याचा तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT