Nora Fatehi 
मनोरंजन

कुणाकडून घेतली नोरानं 'रेंज रोव्हर'?: चॅट व्हायरल

बॉलीवूडमध्ये (bollywood) वेगवेगळ्या कारणावरुन सेलिब्रेटी चर्चेत येत असतात.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बॉलीवूडमध्ये (bollywood) वेगवेगळ्या कारणावरुन सेलिब्रेटी चर्चेत येत असतात. यापूर्वी ड्रग्ज, मनी लॉड्रींग यामुळे बॉलीवूड सेलिब्रेटी (bollywood celebrity) लाईमलाईटमध्ये आले होते. त्याचा परिणाम बॉलीवूडवर मोठ्या प्रमाणात झाला होता. बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (sushant singh rajput) प्रकरणात बॉलीवूडमधील ड्रग्ज प्रकरण उजेडात आलं होतं. आताही बॉलीवूडच्या काही दिग्गज अभिनेत्रींची नाव पैशांच्या गैरव्यवहारात आली आहेत. सध्या प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेहीचं (actress nora fatehi) नाव वेगळ्या प्रकरणात गोवलं गेलंय. मनी माफिया सुकेश चंद्रशेखरनं तिला महागड्या गाड्यांची भेट दिली होती. यासंबंधीचं तिचं चॅट बाहेर आलं आहे. यामुळे नोराच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून नोरा आणि जॅकलीनला चौकशीसाठी ईडीनं बोलावणं धाडल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

बॉलीवूड अभिनेत्री आणि डान्सर नोराला मनी माफिया सुकेश चंद्रशेखरनं एक महागडी कार भेट दिली होती. त्यासंबंधीचं चॅट व्हायरल झालं आहे. त्या चॅटमध्ये असं म्हटलं आहे की, चंद्रशेखरनं नोराला विचारलं होतं की, तुला रेंज रोव्हर आवडते का? त्यावर नोरानं आपल्याला रेंज रोवर आवडते असं सांगितलं. न्युज 18 नं दिलेल्या माहितीमध्ये नोराविषयीची ही धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना आश्चर्य वाटले आहे. गेल्या काही दिवसांपासून जॅकलीन आणि नोरा या दोन्ही अभिनेत्री सुकेश चंद्रशेखरमुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांचीही नावं या प्रकरणात समोर आली आहेत. मला रेंज रोवर आवडते. ती एक सुंदर गाडी आहे. यावर चंद्रशेखर नोराला म्हणाला, मी तुला आणखी काही ऑप्शन देतो. अशा आशयाचं चॅट पोलिसांच्या हाती लागलं आहे.

सध्या जे चॅट व्हायरल झाले आहे त्यातून आणखी काही महत्वाची माहितीही पुढे येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. चंद्रशेखरनं (Sukesh Chandrasekhar) 200 कोटी रुपयांचा अपहार केला आहे. असा आरोप त्याच्यावर ईडीनं ठेवला आहे. त्यामुळे तो सध्या तुरुंगात आहे. न्युज 18 नं दिलेल्या एका बातमीनुसार सुकेशची 10 बॉलीवूड अभिनेत्रींनी तो तिहारमध्ये असताना भेट घेतल्याची बाब उघड झाली आहे. ईडीच्या सुत्रांनी ही माहिती दिल्याचे सांगितलं जात आहे. यापूर्वी या प्रकरणामध्ये जॅकलीन फर्नांडिझ आणि नोरा फतेही यांची चौकशी करण्यात आली आहे. यांच्याशिवाय आणखी काही बड्या सेलिब्रेटींची नावं समोर येणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Nagpur EVM Training: आगामी निवडणुकीत ‘एस-३’ मतदान यंत्राचा वापर;नागपूर जिल्ह्याला तीन हजार कंट्रोल युनिट प्राप्त; कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

पत्नीशी वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, ३२ वर्षीय मुलाने वडिलांना झोपेतच संपवलं; डोंबिवली हादरली

SCROLL FOR NEXT