Sukesh Chandrashekhar Jacqueline Fernandes bollywood Actress  esakal
मनोरंजन

Sukesh-Jacqueline Fernandes : एवढी टाईट सिक्युरिटी असताना 'सुकेश' जॅकलीनशी संपर्क साधायचा तरी कसा?

दिल्लीनंतर तिहारच्या आणि त्यानंर मंडोलीच्या तुरुंगात बंदिस्त असलेल्या सुकेशनं जॅकलीनसोबत सातत्यानं संपर्क ठेवला आहे.

युगंधर ताजणे

Sukesh Chandrashekhar Jacqueline Fernandes bollywood Actress : कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार करणारा सुकेश चंद्रशेखर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याचे नाव जॅकलीनसोबत जोडले जाऊ लागल्यानं त्याला वेगळेच वळण मिळाले होते. सुकेशनं आतापर्यत जॅकलीन आणि तिच्या कुटूंबियांना महागडे गिफ्ट्स दिल्याचे एका तपासातून समोर आले होते.

दिल्लीनंतर तिहारच्या आणि त्यानंर मंडोलीच्या तुरुंगात बंदिस्त असलेल्या सुकेशनं जॅकलीनसोबत सातत्यानं संपर्क ठेवला आहे. त्यामुळे त्रस्त ठेवलेल्या जॅकलीननं आता दिल्ली पोलीस आणि कोर्टाकडे धाव घेतली आहे. जेलमध्ये एवढी कडक सुरक्षा असताना सुकेश कशाप्रकारे जॅकलीनशी संपर्क साधत होता याचे नेटकऱ्यांना कुतूहल असल्याचे दिसून आले आहे. दिल्ली पोलिसांनी पाचशे कोटींचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी सुकेशला अटक केली आहे.

यानंतर सुकेशनं जॅकलीनला कित्येक विदेशी क्रमांकावरुन फोन केले होते. एवढेच नाही तर त्यानं कित्येक व्हाट्स अप चॅट देखील तिच्यासोबत केल्याचे समोर आले आहे. जॅकलीननं कोर्टाच्या एका सुनावणीमध्ये सांगितले होते की, त्यानं आपल्याला कोर्टात येताना ब्लॅक रंगाचा सूट परिधान करण्यास सांगितले होते.

सुकेशनं जेलमधून जॅकलीनला ऑडिओ मेसेज देखील पाठवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आज तक च्या एका रिपोर्टममध्ये याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. मी जेव्हा त्यानं सांगितलेला ब्लॅक रंगाचा सूट परिधान केला नाही तेव्हा तो माझ्यावर खूपच नाराज झाला होता. त्यानं चिडून मला मेसेजही केला होता. सुकेशनं जेलमधून मोबाईलचा वापर केल्याचे दिसून आले आहे.

सुकेशनं आपल्याला सतत मेसेज करुन लव्हशिपसाठी पुढाकार घेतला होता. तो त्याविषयी बोलायचा. मी तो विषय टाळल्यास त्यानं रागानं मला धमक्याही दिल्याचे जॅकलीननं त्या सुनावणीमध्ये सांगितले आहे. जेलमध्ये कैद्यांना मोबाईल किंवा त्यासारख्या इतर कोणत्याही वस्तू नेण्यास बंदी असताना सुकेशनं त्या वस्तूंचा वापर करुन जॅकलीनशी सतत संपर्क साधला होता.

सुकेशच्या सततच्या मेसेजला जॅकलीन वैतागली होती. म्हणून तर तिनं दिल्ली पोलिसांकडे त्याबाबत तक्रारही दिली होती. दिल्ली पोलिसांनी देखील त्यावर आपण तातडीनं कडक कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाहीतर जॅकलीननं कोर्टामध्ये देखील सुकेशच्या विरोधात एक अर्ज केला आहे. त्यामध्ये तिनं आपल्याला त्याच्याकडून होणाऱ्या मानसिक त्रासाविषयीचा उल्लेख केला आहे.

जॅकलीननं त्या अर्जामध्ये सुकेशची जी कामं आहेत त्याविषयी सांगितले आहे. तो आपल्याला सतत धमकावत असून मानसिक त्रास देत असल्याचे म्हटले आहे. आता कोर्टानं दिल्ली पोलीस आणि जेल प्रशासनाकडून याप्रकरणाबाबत खुलासा मागितला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sound System Ban : देव-देवतांच्या मिरवणुकीत आता 'या' गोष्टींना नो एन्ट्री; सरकारने काय दिले संकेत? संस्कृती जपण्यासाठी उचलणार कठोर पाऊल!

CIDCO: आनंदाची बातमी! सिडकोने गृहकर्ज मर्यादा वाढवली; आता घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार, व्याजदर अन् नवीन लिमिट किती?

Gudi Padwa 2026: भोपाळमध्ये 'मराठी' थाट! मुख्यमंत्र्यांनी घातली पेशवाई पगडी; ढोल-ताशांच्या गजरात गुढी उभारून केले नववर्षाचे स्वागत

Crime News : नाशिकमध्ये गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! सातपूरमध्ये २५ लाखांच्या मुद्देमालासह ७ जणांना बेड्या

Prajwal Revanna Case : 13 हजार पानांचं आरोपपत्र, 70 पेनड्राइव्ह, 39 आरोपी अन् अंगावर काटा आणणारे पुरावे; माजी खासदाराच्या 'त्या' अश्लील व्हिडिओंचं सत्य समोर!

SCROLL FOR NEXT