Sukesh Chandrashekhar legal notice to Mika Singh his recent comment on Jacqueline Fernandez  SAKAL
मनोरंजन

Sukesh - Mika: जॅकलीनच्या फोटोवर 'ती' कमेंट केल्याने सुकेशचा तीळपापड, गायक मिका सिंगला दिली धमकी अन् कायदेशीर नोटीस

मिका सिंगने जॅकलीनच्या फोटोखाली केलेली कमेंट वाचून सुकेशला राग आलाय

Devendra Jadhav

Sukesh - Mika News: सुकेशने प्रसिद्ध गायक-संगीतकार मिका सिंगला जॅकलिनच्या इंस्टाग्राम फोटोवर कमेंट केल्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यामुळे सर्वांना धक्का बसलाय.

सुकेश हा जॅकलीनचा कथित प्रियकर म्हणून ओळखला जातो. तो कधी जेलमधून तिला लव्ह लेटर देतो. तर कधी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असतो. आता सुकेशने थेट गायक मिका सिंगला जॅकलीनच्या फोटोखाली कमेंट केल्याने कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

(Sukesh Chandrashekhar legal notice to Mika Singh his recent comment on Jacqueline Fernandez)

सुकेश चंद्रशेखरच्या प्रतिमेला डाग

तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने मिका सिंगला इशारा दिला असून कायदेशीर नोटीसही पाठवली आहे. सुकेशचे वकील अनंत मलिक यांनी नोटीसमध्ये म्हटले आहे की, 'तुमच्या वक्तव्यामुळे आमच्या क्लायंटच्या चारित्र्याबद्दल आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल व्यापक चर्चा सुरू झाली आहे, ज्यामुळे त्यांना मीडियाच्या प्रश्नांना सामोरे जावे लागले आहे. ही परिस्थिती त्यांचे संकट वाढवत आहे आणि सतत मीडिया ट्रायलमुळे महत्त्वपूर्ण आव्हाने निर्माण करत आहे.

“आमचा क्लायंट एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांचं भारतीय चित्रपट उद्योग, विविध व्यावसायिक घराणे आणि राजकीय वर्तुळात मानाचं स्थान आहे. त्याला राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर प्रतिष्ठा आहे. मिका सिंग स्वतः बॉलीवूड इंडस्ट्रीचे सदस्य असल्याने, या क्षेत्रात नाव कमवण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो हे त्यांना चांगलेच माहीत आहे. तथापि, तुमच्या कमेंटमुळे आमच्या क्लायंटची प्रतिमा फक्त डागाळली नाही तर त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावरही विपरित परिणाम झाला आहे."

मिका सिंगवर मानहानीचा गंभीर गुन्हा दाखल

नोटीसमध्ये असे लिहिले आहे की, “तुम्हाला हे स्पष्ट करण्यात आले आहे की आमच्या क्लायंटची बदनामी करण्यासाठी आणि त्यांची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी तुम्ही हे जाणूनबुजून आणि बेताल कृत्य केले आहे. आमचे क्लायंट असे वर्तन सहन करणार नाही. म्हणून, तुम्हाला सूचित केले जाते की तुम्ही बदनामीकारक कमेंट केल्याने तुमच्यावर मानहानीचा गंभीर फौजदारी गुन्हा केला आहे. इतर गोष्टींबरोबरच, तुमच्यावर भारतीय दंड संहिता, 1860 च्या कलम 499/500 च्या तरतुदींनुसार खटला भरला जातआहे.”

काय होती मिका सिंगची कमेंट

अलीकडेच जॅकलीन फर्नांडिसने हॉलिवूड अभिनेता जीन-क्लॉड व्हॅन डॅमेसोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोवर मिका सिंगने विचित्र कमेंट केली होती. मिकाने जॅकलिन फर्नांडिस आणि हॉलिवूड अभिनेता जीन-क्लॉड यांच्या फोटोवर लिहिले होते, 'तू खूप सुंदर दिसत आहेस..., आणि तो सुकेशपेक्षा खूप चांगला आहे...' ही वादग्रस्त कमेंट काही वेळातच मिका सिंगने डिलीट केली. मात्र, तोपर्यंत मिका सिंगची ही पोस्ट व्हायरल झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जीवघेणा हल्ला, जनता दरबार सुरु असताना हल्लेखोर आला अन्...

Satara Rain update:'कराड-पाटण तालुक्यात मुसळधार; कराड-चिपळूण मार्ग वाहतूक बंद, अडकलेले कोकणात जाणारे 150 प्रवासी एसटी बसमधून रवाना

HDFC Bank Alert: HDFC ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बँकेच्या अत्यावश्यक सेवा दोन दिवस बंद राहणार

Dhanashree Verama: युझवेंद्र चहलच्या 'Sugar Daddy' टी शर्टवर धनश्रीची जोरदार टीका; म्हणाली, मी कोर्टात रडले आणि तो...

Pune Rain Update: पुण्यात पावसाचा हाहाकार! एकता नगरमध्ये पाणी शिरलं, खडकवासल्यातून विसर्ग वाढला

SCROLL FOR NEXT