Jacqueline Fernandez esakal
मनोरंजन

Jacqueline Fernandez: 'तिला वाटायचं मी तिच्यावर...' सुकेशचा मोठा खुलासा

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिझच्या बाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Sukesh Chandrashekhar ED Case: बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिझच्या बाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ईडीचा फेरा जॅकलीनभोवती फिरतो आहे. त्यातून अनेक वेगळीच माहिती आली आहे. दोनशे कोटींचा गैरव्यवहार करणाऱ्या सुकेश चंद्रशेखरशी संबंध असणाऱ्या जॅकलीनबाबत त्यानेच एका पत्रातून मोठा खुलासा केला आहे.

सुकेश हा सध्या मंडोली कारागृहात कैद आहे. त्यात सहआरोपी म्हणून जॅकलीनही आहे. यापूर्वी अभिनेत्री नोरा फतेहीला देखील चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. सुकेशनं जॅकलीनला कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या होत्या. त्या तिलाच नव्हे तर तिच्या कुटूंबियांना देखील त्यानं तशाच प्रकारच्या वस्तू दिल्या होत्या असे तपासातून समोर आले होते. जॅकलीनचे ते प्रकरण न्यायप्रविष्ट असून पुढील महिन्यात त्यावर सुनावणी होणार आहे.

ईडीनं केलेल्या तपासातून सुकेशनं एका पत्रातून खळबळजनक खुलासा केला आहे. त्यानं ते पत्र आपल्य़ा वकीलांना पाठवले आहे. त्या पत्रात तो म्हणतो, जॅकलीन ही निर्दोष आहे. यात तिचा काहीही गुन्हा नाही. पीएमएलए प्रकरणात तिला सहआरोपी का म्हटलं आहे हे काही कळायला मार्ग नाही. माझ्यावर देखील जे आरोप आहेत त्यात काहीही तथ्य नाही. काल्पनिक गोष्ट तयार करुन माझी बदनामी केली जात आहे.

मी जर जॅकलीनला किंवा तिच्या कुटूंबियांना गिफ्ट दिले असतील तर त्यात तिचा काय दोष? जॅकलीनची इच्छा होती की, मी तिच्यावर प्रेम करावं. आणि नेहमी तिला पाठींबा देऊ. तिला मी ज्या काही वस्तु दिल्या त्या सगळ्या माझ्या कमाईच्या, मेहनतीनं कमवलेल्या पैशांच्या होत्या. एक गोष्ट मात्र नक्की मी तिच्यावर नेहमीच प्रेम करत आलो आहे आणि राहिल. तिच्यासाठी काहीही करेल. असेही सुकेशनं त्या पत्रात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT