Sumbul Touqeer on facing struggles due to her dark complexion said trolled over her dark skin after imlie promo
Sumbul Touqeer on facing struggles due to her dark complexion said trolled over her dark skin after imlie promo sakal
मनोरंजन

Sumbul Touqeer: तू काळी आहेस.. म्हणत इंडस्ट्रीत मला रंगावरून हिणवलं गेलं.. सुंबूल तौकीर स्पष्टच बोलली..

नीलेश अडसूळ

Sumbul Khan : टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी आणि बिग बॉसमध्ये आपल्या परफॉर्मन्सनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलेली सुंबूल तौकीर खान सध्या बरीच चर्चेत आहे. स्टार प्लसवरील ‘इमली’ मालिकेतून ती घराघरात पोहोचली.. तर बिग बॉसचं १६ वं पर्व तर तिने अक्षरशः गाजवलं.

सुंबूलच्या अभिनयाचं कायमच कौतुक झालं आहे. अगदी एकता कपूरही तिच्या अभिनयाच्या दिवाण्या आहेत. अगदी कमी वयात सुंबूलनेअनेक सुपरहिट मालिका आणि चित्रपट केले. त्यामुळे तिचा चाहतावर्ग मोठा आहे.

पण याच सुंबूलला रंगावरून हिणवलं गेलं आहे. याच्याविषयी नुकतच तिने एका मुलाखतीत भाष्य केलं आहे..

(Sumbul Touqeer on facing struggles due to her dark complexion said trolled over her dark skin after imlie promo)

सुंबूल एका मध्यमाशी बोलताना म्हणाली, 'माझा सुरुवातीचा काळ खूप कठीण होता. मी माझ्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली आणि जेव्हाही मी ऑडिशनसाठी जायचे तेव्हा त्यांना फक्त रंगाने गोऱ्या असणाऱ्या कलाकारांनाच घेतलं जायचं.. ते माझ्यासाठी खूप अपमानास्पद होतं.'

पुढे ती म्हणाली की, 'मला अशा गोष्टी आवडत नाहीत. मला लोकांच्या रंगाशी काहीही देणघेण नाही. पण अशा अनुभवाने मला वाटू लागलं की माझा रंग सावळा आहे, मी लीडची हिरोईन बनू शकत नाही.'

'तसं पाहिलं तर सगळ्या नायिका गोऱ्या होत्या. मी कोणाच्याही विरोधात काही बोलत नाही, पण मी गोऱ्याच मुलींना काम मिळतं यावर मी विश्वास लागले. पण मला ‘इमली’ मालिका मिळाली आणि हा समज मोडीत निघाला.'

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

ती म्हणाली की, 'मला ही मालिका मिळाल्यावरही परिस्थिती बदलली नाही. लोक फोन करून म्हणायचे, कोणत्या मुलीला नायिका म्हणून घेतलं आहे, ती काळी आहे.' हे ऐकल्यावर मल खूप वाईट वाटायचं, यासाठी मी अनेकदा खूप रडले आहे. पण हळूहळू गोष्टी बदलू लागल्या. शोचा टीआरपी वाढला. मी कशी दिसते हे लोक विसरले, त्यांनी माझं काम पाहिलं, ज्यांना मी आवडत नव्हते, तेही माझी स्तुती करू लागले.'

सुंबूलने आधी ‘इमली’ मालिकेसाठी नकार दिला होता. त्यानंतर निर्मात्यांच्या सांगण्यावरून तिने ऑडिशन क्लिप शेअर केली. ‘इमली’साठी पाठवलेली ऑडिशन क्लिप ही आपली सर्वात वाईट ऑडिशन असल्याचं सुंबूलने सांगितलं. दोन आठवडे कोणताही प्रतिसाद निर्मात्यांनी दिला नव्हता, पण नंतर शूटसाठी बोलावल्याने आश्चर्याचा धक्का बसला होता, असंही सुंबूलने सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT