Sumeet Pusavale esakal
मनोरंजन

Sumeet Pusavale: 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'नंतर आता सुमीत पुसावळे दिसणार 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत; साकारणार 'ही' भूमिका

Sumeet Pusavale: सुमीत हा घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जाणून घेऊयात या मालिकेतील सुमीतच्या भूमिकेबद्दल...

priyanka kulkarni

Balumamachya Navan Changbhala: छोट्या पडद्यावरील 'बाळू मामाच्या नावान चांगभल' (Balumamachya Navan Changbhala) या मालिकेमुळे अभिनेता सुमीत पुसावळेला (Sumeet Pusavale) विशेष लोकप्रियता मिळाली. सुमीतनं 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' ( Gharoghari Matichya Chuli) या मालिकेला रामराम करुन आता नव्या मालिकेत एन्ट्री केली आहे. सुमीत हा घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जाणून घेऊयात या मालिकेतील सुमीतच्या भूमिकेबद्दल...

सुमीत पुसावळे साकारणार 'ही' भूमिका

18 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात आहेत. मालिकेचा पहिला प्रोमो रिलीज झाल्यापासूनच या मालिकेतील हृषिकेश या भूमिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. हृषिकेषची भूमिका नेमका कोणता कलाकार साकारणार? याची कमालीची उत्सुकता होती. अखेर त्या प्रश्नाचं उत्तर संपूर्ण महाराष्ट्राला मिळणार आहे. हृषिकेशची व्यक्तिरेखा साकारणार आहे संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका अभिनेता सुमीत पुसावळे. सुमीतला याआधी आपण अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून भेटलोय. मात्र हृषिकेश ही व्यक्तिरेखा त्याने आजवर साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा वेगळी आहे.

भूमिकेविषयी काय म्हणाला सुमीत?

घरोघरी मातीच्या चुली मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना सुमीत म्हणाला, "मी याआधी साकारलेल्या भूमिकेतून बाहेर पडून काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न करतोय. ऐतिहासिक आणि पौराणिक मालिकेनंतर कौटुंबिक मालिकेत काम करण्याचा अनुभव घेतोय त्यामुळे प्रेक्षकांप्रमाणेच मी देखिल उत्सुक आहे. या मालिकेकडे पहाण्याचा माझा दृष्टिकोन नक्कीच वेगळा आहे. खूप चांगले कलावंत मालिकेत आहेत. एकत्र कुटुंबाची गोष्ट आहे. मला असं वाटतं एकत्र कुटुंब ही रणदिवे कुटुंबाती खरी ताकद आहे. आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलोय, की एक लाकडाची काठी तोडणं सोपं आहे मात्र लाकडाची मोळी तोडणं तितकंच अवघड. त्यामुळे कुटुंबाचं महत्त्व अधोरेखित करणारी घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रेक्षकांना आवडेल याची खात्री आहे. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका घरोघरी मातीच्या चुली"

पाहा प्रोमो:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT