sumeet pusavale ukhana for wife in his wedding  sakal
मनोरंजन

Video: तिकडून आली मोनिका आणि.. 'बाळूमामा' फेम अभिनेता सुमीत पुसावळेचा बायकोसाठी खास उखाणा..

sumeet pusavale ukhana: अभिनेता सुमीत पुसावळे नुकताच विवाह बंधनात अडकला आहे.

नीलेश अडसूळ

sumeet pusavale: सध्या सर्वत्र लग्न सराई सुरु आहे. त्यातच मनोरंजनविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. नुकतंच अक्षया देवधर व हार्दिक जोशीने लग्नगाठ बांधली. त्याच दिवशी अभिनेता आशय कुलकर्णीही यांनीही लग्न केलं. तर त्यांच्या पाठोपाठ 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेतन 'बाळूमामा' यांची भूमिका साकारणारा अभिनेता सुमीत पुसावळे देखील लग्नबंधनात अडकला आहे. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. अशातच त्याने बायकोसाठी घेतलेल्या खास उखण्याचा व्हिडिओही आता समोर आला आहे.

(sumeet pusavale ukhana for wife in his wedding)

सध्या अभिनेता सुमीत पुसावळे चांगलाच नावारूपाला आला आहे. सुमीतचा चाहतावर्ग मोठा आहे. सुमीतने १४ डिसेंबर रोजी (बुधवारी) सांगोला येथे अत्यंत पारंपरिक पद्धतीने अनई थाटामाटात लग्न केले. मोनिका महाजन अशा त्यांच्या बायकोचे नाव असून त्यांनी अरेंज मॅरेज केले आहे. मोनिका ही आयटी सेक्टर मध्ये कामाला आहे. सुमीतच्या लग्नाचे बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच एक उखाणा घेतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

हा उखाणा घेताना सुमीत म्हणतो, 'गल्लीमध्ये खेळत होतो क्रिकेट.. तिकडून आली मोनिका आणि पडली माझी विकेट...' सध्या हा उखाणा चांगलाच चर्चेत आहे. यावेळी सुमीतची बायको अगदी गोड लाजताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cruise Incident: बर्गी धरणात मोठा अपघात! ४० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले; ४ जणांचे मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता

GT vs RCB Live: विराट कोहलीने घातला राडा! रजत पाटीदारच्या विकेटवरून संतापला, जेसन होल्डरच्या झेलवरून चिडला: अम्पायरसोबत वाद

RTE Admission Deadline Extended: आरटीई २५ टक्के राखीव प्रवेशांसाठी अंतिम मुदतवाढ; पालकांना ८ मे पर्यंत संधी

Maharashtra Private School Fee Refund: खासगी शाळांना शुल्क परतावा धोरणाच्या दिशेने एक पाऊल; प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

सोलापूरच्या पोलिस दलातील ‘या’ १५ अधिकारी-अंमलदारांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह! महाराष्ट्र दिनानिमित्त आज पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव, वाचा...

SCROLL FOR NEXT