sumeet raghavan tweet on bmc eknath shinde and devendra fadnavis after g 20 summit cleaning mumbai sakal
मनोरंजन

Sumeet Raghvan: आम्ही बोंबलतोय, विणवण्या करतोय.. पण.. सुमीत राघवनचा थेट मुख्यमंत्र्यांना प्रश्न

अभिनेता सुमीत राघवन याने थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालिकेकडे आपला मोर्चा वळवला आहे.

नीलेश अडसूळ

summet raghvan: मराठीसह हिंदीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता सुमीत राघवन सध्या बराच चर्चेत आहे. सध्या त्याने आपला मोर्चा आरे कारशेड कडे वळवला आहे. करशेड हे आरे इथेच व्हावे यासाठी तो आंदोलकांना प्रचंड धारेवर धरत आहे. त्यामुळे आंदोलकही त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. बऱ्याचदा तो या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने लिहीत असतो, पण आज चक्क त्याने त्यांना जाब विचारला आहे.

(sumeet raghavan tweet on bmc eknath shinde and devendra fadnavis after g 20 summit cleaning mumbai)

सुमीत ट्वीटरवर विविध मुद्द्यांवर भाष्य करत असतो. सध्या मुंबईत जी 20 परिषदेची लगबग सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर महापालिकेसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना सुमीतने थेट प्रश्न केला आहे. त्याने ट्विटरवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये जी२० परिषदेची लगबग, स्वच्छ रस्ते, सफाई करणारे कर्मचारी रंगीत डिववायडर, त्यावर फुलझाडं असे काही फोटो आहेत. जे पाहून ही आपली मुंबईच का असा प्रश्न पडतो. म्हणून ही फोटो दाखवत सुमीतने आपली नाराजी व्यक्त केली आहे.

या ट्विट मध्ये सुमीत म्हणतो, 'मुंबई महापालिकेला एक साधा प्रश्न विचारायचा आहे की, जी२० परिषदेतील मान्यवर व्यक्ती येणार असतील तरच मुंबईकरांच्या नशिबी हे चित्र असणार आहे का? बाकी आजन्म आम्ही बोंबलतोय, विनवण्या करतोय तेव्हा ही तत्परता कुठे जाते?' असा सवाल करत त्याने राज्य सरकार आणि पालिकेला धारवेर धरले आहे.

पुढे तो म्हणतो, 'जवळ जवळ आनंदाश्रू आले होते. देव करो आणि ही परिषद दर सहा महिन्यांनी मुंबईत होवो. जी २० परिषदे झिंदाबाद.' त्याचे ही ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

मुंबईसह देशभराचे लक्ष लागून राहिलेल्या जी२० परिषदेच्या बैठकांना सुरुवात झाली आहे. या परिषदेअंतर्गत महाराष्ट्रात एकूण १४ बैठका होणार आहे. यातील ८ बैठका या मुंबईत पार पडणार आहेत. तर पुण्यात ४ तर नागपूर आणि औरंगाबादेत प्रत्येकी एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. जी२० परिषदेनिमित्त मुंबईत अनेक ठिकाणी सुशोभीकरण केले जात आहे. यावरुन अभिनेता सुमीत राघवनने राज्य सरकारवर टीका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT