मनोरंजन

No Mobile In Theater : कायमस्वरूपी तोडगा निघावा

सुमीत राघवन

नाशिक येथे प्रयोगादरम्यान घडलेला प्रकार पुन्हा उद्‌भवू नये यासाठी प्रेक्षकांना कसे साक्षर करावे, हेच मला समजत नाही. यावर नाट्यगृहामध्ये जॅमर बसवणे हा जो उपाय पुढे येत आहे. हा उपाय किती योग्य आहे, हे आता सांगता येत नाही. नाट्यगृह किंवा चित्रपटगृहाबाहेर नो स्मोकिंगचे बोर्ड असतात, तसे मोबाईल सायलेंटवर असल्याचेही बोर्ड लावावेत. यावर राज्य सरकारने तोडगा काढला पाहिजे. एखाद्या प्रेक्षकाच्या बेशिस्तीमुळे अन्य प्रेक्षकांना आणि कलाकारांना सादरीकरणात त्रास झाल्यास त्या प्रेक्षकावर दंड आकारावा. असा नियम केल्यास प्रेक्षक आपल्या वागणूकीबाबत साक्षर होतील, असे वाटते. 

नाशिकमधील प्रयोगादरम्यान मला खूप त्रास झाल्यामुळे मी प्रयोग थांबवला. आज प्रत्येक कलाकाराने या होणाऱ्या त्रासाबद्दल जाहीरपणे बोलले पाहिजे. प्रेक्षकांच्या या बेशिस्तीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रत्येक कलाकाराने आमच्या नाटकादरम्यान मोबाईल वाजला, नाटक थांबवून त्या प्रेक्षकाला बाहेर जाण्यास सांगावे. ही भूमिका प्रत्येकच कलाकाराने घ्यावी. मान्य आहे की, काही वृद्ध प्रेक्षकांना मोबाईल सायलेंट करता येत नाही. आम्ही नाटकाच्या सुरवातीलाच प्रेक्षकांना सूचना करतो की, तुमच्या बाजूला असलेल्या सिनिअर सिटीझन प्रेक्षकांना त्यांचा मोबाईल सायलेंटवर करण्यास मदत करावी.

नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाराच्या जवळ उभा असलेल्या डोअर किपरने प्रेक्षक नाट्यगृहात येत असतानाच त्यांना विचारावे, की तुमचा मोबाईल सायलेंट आहे का? असे पत्रकच राज्य सरकारने काढावे. या वाढत जाणाऱ्या बेशिस्तीबद्दल काय करता येईल, यावर तोडगा काढण्यासाठी मी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्याकडे एक प्रस्ताव ठेवणार आहे. कलाकारांबरोबरच नाटक पाहायला आलेल्या रसिक प्रेक्षकांनाही या बेशिस्तीचा त्रास होतोच. नाट्यसृष्टीतील प्रत्येक मोठ्या कलाकाराने मोबाईल बेशिस्तीबाबत भूमिका घेऊन त्या प्रेक्षकांमध्ये शिस्तीचे भान निर्माण केले पाहिजे. 

या प्रकरणात मला पाठिंबा देणाऱ्या सर्व नेटकरींचा मी आभारी आहे. मला वाटते, नाटकच नव्हे तर गाण्याचा कार्यक्रम, नृत्याचा कार्यक्रम किंवा चित्रपट सुरू असताना मोबाईल वाजताच कामा नये. एवढेच नव्हे, तर भर प्रयोगात लोक मोबाईल बोलतात. असे वागणे अत्यंत चुकीचे आहे. हा मुद्दा अत्यंत संवेदनशील असल्याने त्यावर लवकरात लवकर कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cockroach Janata Party: दिल्लीत ‘कॉक्रोच’ची एन्ट्री! जंतरमंतरवरील आंदोलनाला पोलिसांची परवानगी; हजारो युवक जमणार

Kolhapur Police Transfers : कोल्हापूर जिल्ह्यातील दहा पोलिस निरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या, एसपींनी काढले आदेश

Latest Marathi News Update: नागपूरमध्ये ३५३ व्या शिवराज्यभिषेक दिन सोहळ्यानिमित्त साहसी खेळांचं सादरीकरण

अभिजीतला विमानतळावरून अधिकाऱ्यांनी अज्ञातस्थळी नेलं, संपर्क होईना; CJPच्या दाव्याने खळबळ, आंदोलनाला परवानगी

Pune: पुणे दुर्घटनेनंतर दारूमाफियांविरोधात राज्यव्यापी सर्जिकल स्ट्राईक; आठ दिवसांत ३,३१२ गुन्हे; २,७५७ जणांना अटक, ७४ हजार लिटर गावठी दारू जप्त

SCROLL FOR NEXT