sumeet raghvan and shefali vaidya 
मनोरंजन

'तुमच्यात आणि क्रांतीला ट्रोल करणाऱ्यांमध्ये काय फरक?' सुमीत राघवनची खरमरीत पोस्ट

'नको तिथे शौर्य दाखवायला जायचं आणि..'; शेफाली वैद्य यांची चिन्मयी सुमीतवर टीका

स्वाती वेमूल

अभिनेत्री क्रांती रेडकरला Kranti Redkar पाठिंबा देण्यावरून लेखिका, ब्लॉगर शेफाली वैद्य Shefali Vaidya आणि अभिनेता सुमीत राघवन Sumeet Raghvan यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. सुमीतची पत्नी चिन्मयीच्या एका पोस्टवर शेफाली यांनी टीका केली. त्यानंतर चिन्मयला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता या एकंदर प्रकरणात सुमीतने काही ट्विट करत शेफाली यांना उत्तर दिलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

फॅब इंडियाच्या दिवाळीनिमित्तच्या जाहिरातीत मॉडेल्सनी टिकली न लावल्याचा मुद्दा शेफाली यांनी उचलून धरला होता. त्यानंतर ट्विटरवर 'नो टिकली नो बिझनेस' हा ट्रेंड जोरदार चर्चेत राहिला. यावरूनच चिन्मयी यांनी एक ट्विट करत लिहिलं, 'मला अनावर इच्छा झाली होती एखादी सणसणीत पोस्ट टाकायची पण ती 'टिकली' नाही.' अप्रत्यक्षपणे शेफाली यांच्यावर टीका करणाऱ्या या पोस्टवर त्यांनी उत्तर देताना क्रांतीच्या प्रकरणाचा उल्लेख केला. 'ते टिकलीचं राहू द्या, पण थोडा सणसणीतपणा जरा क्रांती रेडकरच्या बाबतीत दाखवा की. की त्या विषयावर बोलताना धडधडीत शेपूट घातली? क्रांती मराठी मुलगी नाही, की सिनेसृष्टीतली नाही? नको तिथे शौर्य दाखवायला जायचं आणि बोलायला हवं तिथे फुकट मिळालेल्या ठिगळ साडीला आणि खाल्ल्या मीठाला स्मरून पुचाट गप्प पडून राहायचं', असं ट्विट शेफाली वैद्य यांनी केलं. शेफाली यांच्या या ट्विटवर आता सुमीत राघवनने उत्तर दिलं आहे.

सुमीत राघवनचं ट्विट-

'काही दिवसांपूर्वी क्रांतीला असभ्य भाषेला सामोरं जावं लागलं आणि त्याबद्दल मी ट्विट केलं होतं आणि क्रांतीला पूर्ण पाठिंबा दिला होता. काल पासून माझ्या बायकोलादेखील तशाच भाषेला तोंड द्यावं लागतंय, कारण शेफालीताई, तुम्ही चिन्मयीच्या एका पोस्टला भलतंच वळण दिलं. क्रांतीबद्दल कळवळा आहे ते बरोबरच आहे, परंतु तुम्ही एका शब्दाने चिन्मयीसाठी तुमच्या अनुयायांनी केलेल्या असभ्य भाषेचा निषेध केला का? काय फरक आहे मग तुमच्यात आणि क्रांतीला ट्रोल करणाऱ्यांमध्ये? विचारसरणी आणि मुद्दे वेगळे असू शकतात ताई. ३० ते ३५ वर्ष कष्टाने, कुठल्याही गॉडफादरशिवाय आज आम्ही थोडंसं नाव कमावलं आहे. तुमच्या एका बेजबाबदार पोस्टमुळे आज कोणीही सोम्यागोम्या त्या गुडविलची माती करतोय. हे अपमानास्पद आणि निषेधार्ह आहे,' अशा शब्दांत सुमीतने राग व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ODI World Cup 2025: भारतीय संघाची विजयाने दणक्यात सुरुवात! दीप्ती शर्मा - स्नेह राणाची फलंदाजीपाठोपाठ गोलंदाजीतही कमाल

भीमा नदीतील पाण्यामुळे सीनेचा पूर ओसरेना! सोलापूर-विजयपूर महामार्ग आजही बंदच राहणार; उजनी धरणातून ३ महिन्यात सोडले २०० टीएमसी पाणी

मोठी बातमी! ‘मकोका’ची कारवाई टाळण्यासाठी मागितली ६५ लाखांची खंडणी! कोल्हापुरातील सहायक फौजदारासह 5 जणांवर अकलूज पोलिसांत गुन्हा, दोघे अटकेत

Attacked on Ex Minister in Jail : खळबळजनक! माजी मंत्र्यावर तुरुंगात जीवघेणा हल्ला; डोक्याला गंभीर इजा!

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राची आकांशा नित्तूरे दुसऱ्या फेरीत; दिव्या भारद्वाजचीही आगेकूच

SCROLL FOR NEXT