Suneel Darshan on 26-year feud with Sunny Deol esakal
मनोरंजन

Gadar 2 Sunny Deol : सनीनं २६ वर्षांपूर्वी घेतलेले ७७ लाख दिले नाही, प्रसिद्ध निर्मात्याचा आरोप! 'तारा सिंग' पुन्हा अडचणीत

त्या प्रसिद्ध निर्मात्यांमध्ये आणि सनी देओल यांच्यात गेल्या २६ वर्षांपासून भांडणं झाली होती. अद्याप त्यांच्यातील भांडणं मिटलेली नाहीत.

युगंधर ताजणे

Suneel Darshan on 26-year feud with Sunny Deol: एकीकडे बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओलचा गदर २ प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असताना दुसरीकडे त्याच्यावर होणारे वेगवेगळे आरोपही चर्चेत आले आहेत. सनीच्या गदर २ ला भलेही बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला असेल पण त्यासोबत काही जूने वादही पुन्हा बातमीचा विषय होत आहे.

बॉलीवूडचे प्रसिद्ध निर्माते सुनील दर्शन यांनी गदरच्या तारा सिंगवर काही सणसणीत आरोप केले आहेत. त्यामुळे सनी देओलच्या नावाची नव्यानं चर्चा होत आहे. सनी असं काही करु शकेल का, असा प्रश्न सुनील यांच्या त्या आरोपामुळे समोर आले आहेत. सुनील आणि सनी देओल यांच्यात गेल्या २६ वर्षांपासून भांडणं झाली होती. अद्याप त्यांच्यातील भांडणं मिटलेली नाहीत.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

सनीशी आपण त्या भांडणाच्या संदर्भात बोललो. पण त्याला ती भांडणं तो विसंवाद दूर करण्याची इच्छा नसल्याचे दिसून आले आहे. आपण अनेकदा तो प्रयत्नही करुन पाहिला. असेही सुनील यांनी म्हटले आहे. इंडिया टुडेच्या एका बातमीमध्ये यासंबंधीची अधिक माहिती देण्यात आली आहे. सनी देओल हा मला ७७ लाख २५ हजारांचे देणे लागतो. पण त्यानं ते पैसे आपल्याला दिलेले नाहीत. त्याच्याशी यात सामंजस्यानं काही मार्ग काढता येईल का हे देखील विचारणा केली होती.

सुनील यांनी म्हटले की, सनीला आमच्यातील भांडणं मिटवण्याची इच्छा नव्हती. सनी सध्या त्याच्या गदर २ चित्रपटांच्या सक्सेस पार्ट्यांमध्ये व्यस्त आहे. मात्र दुसरीकडे त्याच्यावरील आरोपांनी लक्ष वेधून घेतले होते. काही दिवसांपूर्वी सनीच्या बंगल्यावर जप्ती येणार असेही बोलले जात होते. एका बँकेनं तशी नोटीसही काढली होती. मात्र ती ऑनलाईन नोटीस नंतर रद्द करण्यात आली. कालांतरानं त्यावर सनीनं प्रतिक्रियाही दिली होती.

सुनील दर्शन यांच्या आरोपांनी मात्र सनीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सनीनं आपली मोठी फसवणूक केल्याचा आरोप सुनील यांनी केला आहे. त्यान एका चित्रपटासाठी घेतलेली साईनिंग अमाउंट मला परत केलेली नाही. त्यानं तो चित्रपट करण्यास नकार दिला होता. जर नकार दिला तर त्यानं ती रक्कम परत करणं अपेक्षित होते. पण तसे झाले नाही.

यापूर्वी सुनील दर्शन आणि सनी देओल यांनी अजय, इंतकाम, लुटेरे नावाचे चित्रपट केले आहेत. एका मुलाखतीमध्ये सुनील यांनी सनी देओलविषयीच्या वेगवेगळ्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यामुळे सनी पुन्हा वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup, IND vs PAK: भारताकडून गोलचा पाऊस अन् पाकिस्तान आऊट! दणदणीत विजयासह हरमनप्रीतचा संघ पुढच्या फेरीत प्रवेश

Pune Crime: पुणं हादरलं! डोक्यात हातोडा घालून मित्रांनी काढला मित्राचा काटा; विरोधी पार्टीचं स्टेटस ठेवल्याचा राग

Marathi News Live Updates : जातनिहाय जनगणनेच्या बाबतीत अशा प्रकारची फसवणूक का केली जात आहे? - के. सी. वेणुगोपाल

Yamaha RayZR 125 ला नवा लूक! नवीन रंगांसह मिळणार TFT डिस्प्ले आणि नेव्हिगेशन स्मार्ट फीचर्सचा फूल धमाका

Jintur Rescue News: तीन वर्षांचा चिमुकला १५ फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला; दोन तासांच्या प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर

SCROLL FOR NEXT