Sunidhi Chauhan bollywood Singer esakal
मनोरंजन

Sunidhi Chauhan : 'होय मान्य, माझ्याकडून चुका झाल्या पण....! प्रसिद्ध गायिका काय बोलून गेली?

फार कमी वयातच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेल्या सुनिधीनं एका मुलाखतीमध्ये धक्कादायक गोष्टींविषयी सांगितले आहे.

युगंधर ताजणे

Sunidhi Chauhan bollywood Singer : बॉलीवूडची प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान ही गेल्या दोन दशकांहून अधिक काळ आपल्या आवाजानं चाहत्यांच्या पसंतीची गायिका आहे. तिच्या आवाजाचे चाहते केवळ भारतातच नाहीतर जगातील अनेक देशांत आहे. फार कमी वयातच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेल्या सुनिधीनं एका मुलाखतीमध्ये धक्कादायक गोष्टींविषयी सांगितले आहे.

बॉलीवूड संगीत विश्वामध्ये सुनिधीनं तिच्या नावाची वेगळी छाप उमटवली आहे. तिच्या नावाची मोठी चर्चा आहे. कित्येक बॉलीवूडमधील अभिनेत्रींसाठी गायन केले आहे. त्यातून तिची लोकप्रियताही सातासमुद्रपार गेली आहे. केवळ हिंदी नाहीतर मराठी, कन्नड, तेलुगू, तमिळ, पंजाबी, आसामी, नेपाळी आणि उर्दू भाषांमध्ये तिनं गाणा गात चाहत्यांनी अवीट स्वरानंद दिला आहे. अशा सुनिधीनं काही गोष्टींबाबत स्पष्टपणे तिनं मतं मांडली आहेत.

Also Read - Libya Flood : मृतदेहांचा रस्त्यावर खच,मदतीची केविलवाणी प्रतीक्षा, युद्धाच्या आगीतून बाहेर

वयाच्या अठराव्या वर्षी सुनिधीच्या वैवाहिक नात्यामध्ये कटूता आली होती. त्यानंतर तिनं मोठ्या संघर्षानं स्वताची वेगळी ओळख निर्माण केली होती. तो काळ आपल्या आय़ुष्यातील सर्वात कठीण काळ असल्याचे म्हटले होते. मी माझ्या आय़ुष्यात खूप साऱ्या चुका केल्या आहेत. आणि त्या मला मान्य आहेत. कारण मी आज जे आहे ते माझ्या चुकांमुळे आहे. मी जर त्या चुका केल्या नसत्या तर माझे आयुष्य खूप अळणी झाले असते.

आयुष्यामध्ये आपण जे काही शिकतो त्यात तुमच्या भुतकाळाचा वाटा महत्वाचा असतो. त्यातून आपण काय करु नये हे तुम्हाला आणखी स्वअनुभवाने कळते. तुम्ही त्या गोष्टींमधून बाहेर येता त्याला कारण तुम्हाला त्यावेळी आलेले अनुभव.त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होतो. तोटा नव्हे. त्या काळासाठी मी स्वताचे आभार मानते. त्याला कारण माझ्यातील सकारात्मकता मला उपयोगी पडली.

माझे जेव्हा लग्न झाले तेव्हा मला एक गोष्ट जाणवली की, लग्न हे तेव्हा माझ्या करिअरसाठी टिकणारे नव्हते. त्यात मी अडकून पडले असते. सध्या सुनिधी ही तिचा पती हितेश सोनिक आणि मुलगा तेग यांच्यासोबत आनंदात आहे. काही वर्षांपूर्वी हितेश आणि सुनिधी यांच्या नात्यात कटूता आल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. मात्र हितेशनं त्यावर बोलणे टाळत त्या साऱ्या अफवा असल्याचे म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gotya Gitte: वाल्मिक कराड माझे दैवत, धनंजय मुंडेंना बदनाम करु नका, नाहीतर... फरार गोट्या गित्तेची जितेंद्र आव्हाडांना धमकी, व्हिडिओ व्हायरल

PM Narendra Modi : जागतिक अनिश्‍चिततेत राष्ट्रहित जपणार; ‘स्वदेशी’ वापरण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

Harshwardhan Sapkal : काँग्रेसचा विचार हा पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा

Rahul Mote : परंडा मतदारसंघांमध्ये पुन्हा वाजणार का? 'घड्याळाची ठकठक' घड्याळ तेच वेळ नवी!

MP Nilesh Lanke : अहिल्यानगर शहर पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव; खासदार नीलेश लंके यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT