Suniel Shetty playing cricket son in law kl rahul get trolled amide athiya shetty wedding watch video  
मनोरंजन

Viral Video : जावईबापूला टस्सल, सासरेबुवांचा सिक्सर!; अन्नाच्या बॅटिंगवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

सकाळ डिजिटल टीम

भारतीय क्रिकेटर केएल राहुल आणि चित्रपट अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्या लग्नाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.यादरम्यान अथियाचे वडिल अभिनेता सुनिल शेट्टी यांचा क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी सुनिल शेट्टी यांची चांगलीच फरकी घेतली आहे.

सुनिल शेट्टी या व्हिडीओत मैदानात क्रिकेट खेळताना दिसत आहेत. त्यांनी एख परफेक्ट पुल शॉट खेळल्याचे देखील दिसत आहे. मात्र त्यांचा होणारा जावई भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज केएल राहुल हा सध्या त्याच्या फॉर्मशी झगडताना दिसत आहे.

क्रिकेटर केएल राहुल आणि अथिया शेट्टी जवळपास ४ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. त्याला मागील काही सामन्यांमध्ये साजेशी कामगिरी करता आलेली नाहीये. यावरून लोक वेगवेगळ्या कमेंट करताना दिसत आहेत.

नेटकरी या व्हिडीओला सासरेबुवा जावईबापूंपेक्षा चांगलं खेळतायत अशा आशयाच्या अनेक कमेंट करण्यात आल्या आहेत. तसेच वर्ल्डकपमध्ये केएल एवजी यांनाचा संघात घ्या असे देखील काहीजण कमेंट करत आहेत. तर अनेकांनी जावयाच्या एवजी तुम्हीच खेळायला जा असे देखील लोक म्हणताना दिसत आहेत.

भारतीय क्रिकेटर केएल राहुल आणि चित्रपट अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्या लग्नाचे विधी 21 जानेवारीपासून सुरू होत असून ते 23 जानेवारीपर्यंत चालणार आहेत. सुनील शेट्टी यांच्या खंडाळा फार्महाऊसवर हा कार्यक्रम होणार आहे.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, 21 तारखेला हळदी समारंभ आणि 22 तारखेला मेहेंदी समारंभ होणार आहे. 23 जानेवारीला दक्षिण भारतीय रितीरिवाजानुसार लग्न होणार आहे. या लग्नात सलमान, अक्षय, जॅकी, अनिल कपूर, शिल्पा शेट्टी यांसारखे स्टार्स सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira-Bhayandar : मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल... 'या' बड्या बिझनेसमनने थेट राज ठाकरेंनाच दिले आव्हान

'जावेद अख्तर, आमिर खानसह दाढीवाले आणि गोल टोपी घालणारे लोक मराठी बोलतात का? मनसेच्या 'त्या' कृतीवर नीतेश राणेंचा संताप

Nandapur First Bus Service : नंदापूरमध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच एसटी

Earless Boy Hears: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

SCROLL FOR NEXT