Ahan Shetty wedding  esakal
मनोरंजन

Ahan Shetty wedding : अरबपतीची मुलगी बॉलीवूडच्या अण्णाची होणार सुनबाई! ती आहे तरी कोण?

बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याची सुनील शेट्टीच्या मुलाच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच खंडाळ्याच्या फार्म हाऊसवर अथियाचे लग्न झाले होते.

सकाळ डिजिटल टीम

Suniel Shetty Son Ahan wedding gossip businessmen : बॉलीवूडचा अण्णा म्हणून लोकप्रिय झालेल्या सुनील शेट्टीची लोकप्रियता मोठी आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ लोकप्रिय झालेल्या सुनील शेट्टीच्या मुलीचं अथियाचं लग्न मोठ्या धामधुमीत झालं होतं. बॉलीवूडमधील सेलिब्रेटींना देखील त्याची भुरळ पडली होती.

बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याची सुनील शेट्टीच्या मुलाच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच खंडाळ्याच्या फार्म हाऊसवर अथियाचे लग्न झाले होते. त्याला बॉलीवूडमधील सेलिब्रेटी देखील उपस्थित होते. टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रेटींना अथिया आणि तिचा पती भारताचा स्टार फलंदाज केएल राहुलला शुभेच्छा दिल्या होत्या.

यासगळ्यात सुनील शेट्टीच्या मुलाचं अभिनेता अहानच्या लग्नाची चर्चा रंगताना दिसत आहे. देशातील अब्जाधीश उद्योगपतींची मुलगी तानिया श्रॉफशी तो लग्न करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अहानची गर्लफ्रेंड तानिया सोशल मीडियावर नेहमीच तिच्या वेगवेगळ्या फोटोंसाठी चाहत्यांच्या चर्चेचा विषय असते.अहाननं तडपमधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्या चित्रपटासाठी त्याला बेस्ट न्यु डेब्युचा पुरस्कारही मिळाला होता.

Also Read - ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

ज्युनिअऱ शेट्टी भलेही अजुन बॉलीवूडमध्ये आपले पाय रोवण्यासाठी प्रयत्नशील असला तरी त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. तडपमध्ये अहान हा प्रसिद्ध अभिनेत्री तारा सुतारियासोबत दिसला होता. त्या चित्रपटाला भलेही प्रेक्षकांकडून खास प्रतिसाद मिळाला नसला तरी चाहत्यांचं अहानला प्रचंड प्रेम या चित्रपटाच्या निमित्तानं मिळालं.

अहान हा आता त्याच्या वैयक्तिक गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. सध्या त्याच्या लग्नाची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून तो प्रसिद्ध उद्योगपती जयदेव श्रॉफ यांची मुलगी तानिया श्रॉफला डेट करत असल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर तर या दोघांच्या रिलेशनशिपवर चाहत्यांनी केव्हाच शिक्कामोर्तब केल्याचे बोलले जात आहे.

अथियाच्या लग्नानंतर आता सुनील शेट्टीला अहानच्या लग्नाचे वेध लागले आहे. उद्योगपतीच्या मुलीशी लग्न म्हटल्यावर नेटकऱ्यांकडून सुनील शेट्टीला भन्नाट प्रश्नही विचारण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या लाडक्या लेकीचं अथियाचं खंडाळ्याच्या फार्म हाऊसवर लग्न झालं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी! राज ठाकरे देखील मविआसोबत; निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार

Gold Prices: सोन्याचे वाढलेले भाव म्हणजे धोक्याचा इशारा; 1973 मध्ये नेमकं काय घडलं होतं?

Who is Mahika Sharma? : कोण आहे हार्दिक पंड्याची नवीन गर्लफ्रेंड माहिका शर्मा? दोघांमध्ये नेमकं किती वर्षांचं अंतर?

IND vs WI 2nd Test Live: यशस्वी जैस्वाल खरंच RUN OUT होता का? यष्टिरक्षकाने बेल्स उडवल्या तेव्हा... वादग्रस्त निर्णय? Video

AIमुळे जॉब जाणार नाही, तर निर्माण होणार? पुढील ५ वर्षात भारतात ४० लाख रोजगार निर्मिती, NITI आयोगाचा दावा

SCROLL FOR NEXT