shilpa and suniel shetty
shilpa and suniel shetty  Team esakal
मनोरंजन

'में तुम्हारा बर्थ डे भूल जाऊ ये कभी हो नही सकता'.....

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा (bollywood) प्रसिध्द अभिनेता सुनील शेट्टीनं (suniel shetty) आपली सहकारी अभिनेत्री शिल्पा शेट्टीला (shilpa shetty) तिच्या बर्थ डे (birthday) निमित्तानं शुभेच्छा दिल्यात. यात सुनील शेट्टीचा शिल्पाला विश करण्याचा अंदाज त्याच्या फॅन्सला कमालीचा आवडला आहे. यावेळी सुनील शेट्टीनं आपल्या धडकन या चित्रपटातील एक संवाद सोशल मीडियावर पोस्ट केलायं. तो व्हायरल झालायं. त्यानं ज्या पध्दतीनं शिल्पाला शुभेच्छा दिल्यात. त्याची सध्या सगळीकडे चर्चा होतेय. (suniel shetty wishes shilpa shetty on her birthday with dhadkan movie dialogue)

अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी (social media celebrity) आहे. ती सतत वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करुन चाहत्यांमध्ये चर्चेत असते. तिच्या जन्मदिनी तिला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिल्या आहेत. शिल्पानंही चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करुन त्यांना धन्यवाद दिले आहेत. मात्र यासगळ्यात खास चर्चा झाली ती सुनिल शेट्टीच्या पोस्टची. त्यानं धडकन (Dhadkan) मधील एक संवाद सोशल मीडियावर व्हायरल केलायं.

सुनीलनं लिहिलं आहे, तुम मुझे भुल जाओ ये हो नही सकता, मे तुम्हारा बर्थ डे भूल जाऊं ये तो कभी हो नही सकता अंजली....तुला जन्मदिनाच्या खुप खुप शुभेच्छा. त्याच्या याप्रकारच्या पोस्टमुळे शिल्पाच्या जन्मदिनाची चर्चा झाली. शिल्पानं आपला वाढदिवस आपल्या फॅमिली सोबत सेलिब्रेट केला आहे. तिनं बर्थ डे सेलिब्रेशनचा एक फोटोही पोस्ट केला आहे. त्यात ती पती राज कुंद्रा आणि मुलांसोबत दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी शिल्पानं एक पोस्ट लिहिली होती. त्यात तिनं सांगितलं होतं, सध्या कोरोनामुळे कुणाचेही वाढदिवस साजरे करता येत नाहीत. वियानचाही वाढदिवस या परिस्थितीत साजरा करता आला नाही. कोरोनाचा मोठा फटका शिल्पाला बसला होता. तिच्या घरातील सर्व सदस्यांना कोरोना झाला होता. आता परिवारातील सर्व सदस्य कोरोनातून बरे झाले असल्याचेही तिनं सांगितले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT