Mika Singh चं नवीन गाणं, KRK कुत्ता साँगचा टीझर व्हायरल

गेल्या काही दिवसांपूर्वी पर्ल वी पुरीच्या बलात्काराच्या आरोपाप्रकरणी सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे
Mika Singh
Mika Singh Team esakal

मुंबई - बॉलीवूडमधील प्रसिध्द गायक मिका सिंग (mika singh) हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यानं केआरके (krk khan) वर एक गाणं तयार केलं आहे. त्या गाण्याची पहिली झलक सोशल मीडियावर (social media) प्रसिध्द झाली आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याला चाहत्यांची मोठी पसंती मिळताना दिसत आहे. ते गाणं शेअर करताना त्यानं सांगितले आहे की, हे गाणे तुम्ही तुमच्या मित्रांसाठीही वापरु शकता. काही दिवसांपासून केआरके सोशल मीडियावरुन चर्चेत आला आहे. (mika singh shares a first glimpse of krk kutta song on twitter featuring his fans watch video)

बॉलीवूडचा भाईजान सलमान खान त्याच्या राधे द मोस्ट वाँटेट भाईजान चित्रपटानं (radhe your most wanted bhaijan) चर्चेत आला होता. त्याच्या त्या चित्रपटावर केआरके अर्थात कमाल खाननं रिव्ह्यु केला. त्यानं त्या रिव्ह्युमध्ये राधेवर टीका केली होती. सलमानच्या जिव्हारी ती टीका लागली. त्यानं आपली बदनामी केली म्हणून सलमाननं कोर्टात धाव घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर सातत्यानं तो वादग्रस्त वक्तव्ये करत होता.

गेल्या काही दिवसांपूर्वी पर्ल वी पुरीच्या बलात्काराच्या आरोपाप्रकरणी सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. त्याच्यावरही कमाल खाननं टीका केली होती. यासगळ्या निमित्तानं मिकानं त्याच्यावर गाण्याची निर्मिती केली आहे. ती सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय आहे. सलमान आणि कमाल खानच्या वादात जेव्हा मिका सिंगची इंट्री झाली तेव्हाच मिकानं आपण त्याच्यावर गाण्याची निर्मिती केली आहे.

Mika Singh
'लार्जर दॅन लाइफ' संकल्पनेला छेद देणारा यामीचा पारंपरिक विवाहसोहळा कसा होता?
Mika Singh
वयाच्या ४६व्या वर्षी फिटनेस, सौंदर्याने भुरळ पाडणारी शिल्पा शेट्टी

त्यानं त्या गाण्याचे नाव केआर के कुत्ता असं दिलं आहे. त्या गाण्याचे बीट्स मिकानं शेअर केले आहे. ते गाणं शेअर करताना त्यानं सांगितलं असे की, फॅन्सनं आपल्याकडे त्या गाण्याच्या क्लिप्स शेअर करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आपण त्यांची ती मागणी पूर्ण केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com