Sunny Deol As Hanuman Role esakal
मनोरंजन

Sunny Deol In Ramayana Movie: सनी 'हनुमानाची' भूमिका साकारणार हे फिक्स, पण...!

दंगल, छिछोरे सारख्या फिल्मची निर्मिती करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या रामायणावर आधारित चित्रपटानं प्रेक्षकांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे.

युगंधर ताजणे

Sunny Deol As Hanuman Role : दंगल, छिछोरे सारख्या फिल्मची निर्मिती करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या रामायणावर आधारित चित्रपटानं प्रेक्षकांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. त्यांच्या या चित्रपटात हनुमानाच्या भूमिकेत सनी देओल दिसणार असल्यानं चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. Sunny Deol As Hanuman Role In Nitesh Tiwari Ramayana Movie

रामायणावर आधारित ही फिल्म तीन पार्टमध्ये तयार होणार असून त्यातील श्रीरामाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरचे नाव चर्चेत आहे तर सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीचे नाव घेतले जात आहे. रावणाच्या भूमिकेसाठी साऊथच्या केजीएफ फेम यशची निवड करण्यात आली आहे. या सगळ्यात सनी देओलशी संबंधित एक मोठी अपडेटस समोर येत आहे.

पिंकव्हिलाच्या एका रिपोर्टनुसार, रामायणावर आधारित त्या चित्रपटामध्ये सनी देओल हा भगवान हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. ही भूमिका मिळाल्यानंतर सनी देओल देखील खूपच उत्सुक आहेत. हनुमान हे शक्तीचे प्रतीक आहे. बॉलीवूडमध्ये आपल्या भूमिकांमधून सनीनं त्याच्या व्यक्तिमत्वाचा परिचय करुन दिला आहे. त्यामुळे चाहत्यांना असे वाटते की, तो या भूमिकेसाठी योग्य आहे.

पहिल्या चित्रपटात असणार कॅमिओ....

रामायणावर आधारित तो चित्रपट तीन पार्टमध्ये तयार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रिपोर्टनुसार हनुमानाच्या भूमिकेसाठी सनी देओलची निवड ही फिक्स समजण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या रोल ची चर्चा होती. असंही बोललं जात आहे की, सनी देओलचा पहिल्या पार्टमध्ये गेस्ट अॅपिरियन्स असणार आहे.

या इपिक ट्रायोलॉजीमध्ये शेवटच्या पार्ट मध्ये सनी देओल फुल फ्लेजमध्ये दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. फिल्म मेकर्सला असा विश्वास आहे की, प्रसिद्ध अभिनेता दारा सिंह यांनी त्यांच्या हनुमानाच्या भूमिकेतून प्रेक्षकांना जिंकून घेतले होते. ती भूमिका नेहमीच आयडल मानली गेली आहे. त्यानंतर सनी देओलची भूमिकाही त्याच पद्धतीची असेल असा विश्वास मेकर्सला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Tweet Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या फोटोसह संजय राऊतांचे खरमरीत ट्वीट, 'खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय...' राजकीय वातावरण तापलं

Pune Voter List: पुण्यात मतदार यादीत मोठी कपात! ११ लाख मतदार बेपत्ता, २ लाख मृत; प्रारूप यादी २४ ऑगस्टला

SIR चा फॉर्म मोबाईलवरून ऑनलाइन कसा भरायचा? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या; 17 ऑगस्ट शेवटची तारीख

Marathi News Live Updates : मेटाचा केजरीवालांना दणका, इन्स्टा अकाउंट केलं बंद; केजरीवाल म्हणाले, PM मोदींसमोर इतकं झुकू नका

Woman Gives Birth on Bike : महिलेने मोटारसायकलवरच दिला बाळाला जन्म, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांचा आईच्या धैर्याला सलाम

SCROLL FOR NEXT