Sunny Deol video viral  Esakal
मनोरंजन

Sunny Deol: सनी पाजी झाले टुल्ल, रिक्षाचालकानं दिला धीर! व्हिडिओ व्हायरल...

सनी पाजीचा व्हिडिओ व्हायरल!

Vaishali Patil

Sunny Deol in Mumbai street: सध्या मनोरंजन विश्वात देओल परिवाराची बरिच चर्चा आहे. एकीकडे बॉबी देओल अ‍ॅनिमल' चित्रपटातून प्रेक्षकांची मन जिंकत आहे तर दुसरीकडे अभिनेता सनी देओलच्या 'गदर 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं होतं.

गदर 2 चित्रपटातून त्याने पुन्हा मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. मात्र सनी देओल सध्या चर्चेत आला आहे. काही दिवसांपुर्वी सनी पाजी चांगलाच ट्रोल झाला होता.

दिवंगत दिग्दर्शक राजकुमार कोहलीच्या प्रार्थना सभेत हसताना दिसलेल्या सनीवर नेटकऱ्यांनी टीका केली होती. आता पुन्हा सनी देओलचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना धक्काच बसला आहे.

सनी देओल मुंबईच्या जुहू सर्कलमध्ये रात्री उशिरा मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर फिरताना दिसला असा दावा करण्यात येत आहे. या व्हिडिओतही दिसते की सनी पाजी फुल टल्ली होऊन रस्त्यावर फिरत आहे.

तो एका ऑटो धडकणार इतक्यात त्या ऑटो चालकाने त्याला ओळखले आणि त्याची मदत केली. यानंतर त्या रिक्षा चालकाने सनीला पकडून ऑटोमध्ये बसवले.

या व्हिडिओत सनी रिक्षा चालकाशी बोलताना आणि हसताना दिसत आहे. तर व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीला ऑटोचालकाने फटकारले आणि बाजूला केले आहे.

हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर होताच व्हायरल झाला आणि नेटकरी व्हिडिओवर कमेंट करत आहेत. एकानं लिहिले, जनतेची सेवा करून थकलो. त्यांना सहानुभूतीचे टॉनिक हवं आहे. तर दुसऱ्याने लिहिले आहे की, हातपंप उखडलेल्या व्यक्तीची आताची ही अवस्था पहा.

तर आणखी एका नेटकऱ्यांने लिहिले, तो फिरत नाही तर नाचत आहेत. एकानं लिहिलं, सर या, मी तुम्हाला लाहोरला सोडतो.

मात्र हा व्हिडिओ खरा नसून सनीचा हा व्हिडिओ त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमधला सीन आहे. सनीचा बचाव करताना एकानं कमेंट केली आहे की, 'व्हिडिओ मागचे सत्य म्हणजे सनी त्याच्या पुढच्या 'सफर' चित्रपटाचे शूटिंग करत आहे आणि समोर आलेला हा व्हिडिओ त्याच्या चित्रपटाचा एक भाग आहे.'

सनीचा खुलासा!

सनी देओल दारुच्या व्यसनापासून लांब आहे. त्याने स्वतः एका मुलाखतीत खुलासा केला होता की, तो दारूपासून दूर राहतो.

या मुलाखतीत तो म्हणला, "मी प्रयत्न केलाच नाही असे नाही, मी इंग्लंडला गेल्यावर समाजाचा एक भाग बनण्याचा प्रयत्न केला, पण मला दारू काय प्रकार आहे हे समजू शकले नाही कारण ती खूप कडू होती.

त्याशिवाय, एक उग्र वास, ती पिल्यानंतर डोकं दुखत असताना का प्यायची? याला काही अर्थ नाही, म्हणून मी कधीच पीत नाही." त्यामुळे आता हा व्हिडिओ खरा नसून केवळ शुटिंगमधला एक सीन असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: मुलं म्हणतील, आई-वडिलांनी पैसे घेऊन मत विकले... राज ठाकरेंनी सांगितलं लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचं गणित?

ZP Election Date News : जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा कधी? इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता

Ajit Pawar Pune Manifesto: पुण्यात मोफत मेट्रो अन् मोफत बस देणार, अजित पवारांचं पुणेकरांना आश्वासन! दोन्ही राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध

Gold Rate Today : खरेदीदारांना धक्का! अमेरिकेच्या ‘मी’पणामुळे सोनं-चांदी उसळली; आज खरेदी करायची असेल तर आधी हे दर पाहाच!

WPL 2026 मध्ये आज Gujarat Giants चा UP Warriors विरुद्ध सामना, मागील कामगिरी सुधारण्याकडे दोन्ही संघाचं लक्ष्य; आज कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT