Gadar 2 Triler Views  Esakal
मनोरंजन

Gadar 2 Triler Views: अजूनही सनीची हवा कायम! ट्रेलर रिलिज होताच झाला 'गदर', केला रेकॉर्ड...

Vaishali Patil

Gadar 2 Triler Views: सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या गदर 2 सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात आहे. या चित्रपटातील गाणीही रिलिज करण्यात आली आहे. जी प्रेक्षकांना खुपच आवडली आहे. टिझर आणि गाण्यांना मिळालेल्या प्रतिक्रियानंतर निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज केला. गदर 2 च्या ट्रेलर बुधवारी यु ट्यूब वर रिलिज करण्यात आला.

कारगिल विजय दिवसाच्या मुहूर्तावर निर्मात्यांनी 'गदर 2' चित्रपटाचा टिझर रिलिज केला म्हणजेच 26 जुलै रोजी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. ज्याला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला.

या चित्रपटाचा टिझर रिलिज होताच 24 तासांच्या आत या चित्रपटाच्या ट्रेलरने व्ह्यूजचा रेकॉर्ड बनवला आहे. 24 तासांत सर्वाधिक पाहिलेल्या हिंदी चित्रपटांच्या ट्रेलरच्या लिस्टमध्ये गदरचा सामावेश झाला आहे.

सनी देओल आणि अमिषा पटेलच्या गदर 2 च्या ट्रेलर 24 तासांत 50 मिलियन व्ह्यूज मिळाले आहे.

सनी देओलच्या 'गदर 2' चित्रपटाचा ट्रेलर लोकांना आवडला आहे. चित्रपटाच्या 3.02 मिनिटांच्या ट्रेलरमध्ये सनी देओल म्हणजेच तारा सिंग डॅशिंग रूपात पाहायला मिळत आहे.

तारा सिंग त्याचा मुलगा जीतला पाकिस्तातुन सोडवायला जातो तेव्हा तो पाकिस्तानमध्ये कहर करतो. पाकिस्तानच्या आर्मीवर तो हल्ला करतांना दिसत आहे.

आता या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून त्याला प्रेक्षक चित्रपटगृहात कसा प्रतिसाद देतात हे पहावं लागेल.

अनिल शर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'गदर' हा चित्रपट 2001 साली आला होता आणि आता 22 वर्षांनंतर 2023 साली 'गदर 2' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यात उत्कर्ष शर्मा, सनी देओल आणि अमिषा पटेल दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT