Gadar 2 On OTT esakal
मनोरंजन

Gadar 2 On OTT : 'गदर २ ओटीटीवर कधी येणार?' काय आहे मेकर्सचं म्हणणं?

मेकर्सनं गदर २ च्या सक्सेस पार्टीमध्ये तिसऱ्या पार्टविषयी घोषणा केली होती. मेकर्सनं हिरवा कंदील दिल्याची चर्चा आहे.

युगंधर ताजणे

Gadar 2 On OTT : सनीच्या गदर २ ने प्रेक्षकांना जिंकून घेतले आहे.दोन दशकांच्या प्रतिक्षेनंतर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यानं पाचशे कोटींकडे झेप घेण्यास सुरुवात केली आहे. यंदाच्या वर्षांत बॉलीवूडच्या चित्रपटांची सरशी राहिली असून त्यात गदर २ चे योगदान महत्वाचे आहे.

अनिल शर्मा दिग्दर्शित गदर २ हा लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असून त्याविषयी मेकर्सकडून स्पष्टीकरण आले आहे. गदर ३ बाबतही यापूर्वी चर्चा सुरु होती. त्याबाबत देखील मेकर्सनं सध्या गदर २ चा माहोल आहे. लोकांना गदर २ चा आनंद घेऊ द्या.त्यानंतर नव्या लेखकांना गदर ३ बाबत सुचना करण्यात येतील.असे सांगण्यात आले होते.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

मेकर्सनं गदर २ च्या सक्सेस पार्टीमध्ये तिसऱ्या पार्टविषयी घोषणा केली होती. मेकर्सनं हिरवा कंदील दिल्याची चर्चा आहे. अशातच गदर २ ओटीटीवर येणा असल्याच्या बातमीनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. साधारण कोणताही नवा चित्रपट थिएटरमध्ये आल्यानंतर एक ते दीड महिन्याच्या अंतरानं ओटीटीवर प्रदर्शित होतो असे दिसून येते. मात्र गदर २ ची गोष्ट वेगळी आहे.

गदर २ ओटीटीवर कधी येणार असा प्रश्न मेकर्सला नेटकरी विचारत असताना त्याबाबत अजूनही कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही. प्रेक्षकांना ओटीटीवर गदर २ पाहायचा असल्यास अजून दोन महिने वाट पाहावी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याचे कारण गदर २ अजूनही थिएटरमध्ये पाहण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

विक एंडच्या दिवशी हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहे. त्यामुळे मेकर्स इतक्यात तरी हा चित्रपट ओटीटीवर आणण्याचा विचार करणार नाही. अशी चर्चा आहे. गदर २ ने आतापर्यत चारशे कोटींपर्यत झेप घेतली असून लवकरच तो पाचशे कोटींच्या घरात प्रवेश करेल असे बोलले जात आहे. त्यामुळे चित्रपटाला जोरदार प्रतिसाद मिळत असताना तो ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कफ सिरप रॅकेटमध्ये खळबळजनक खुलासा, ७०० कंपन्या फक्त कागदावर, अब्जावधींची कमाई; EDचा दावा

Viral Video: भाजी खरेदीसाठी चक्क रेल्वे क्रॉसिंगवर ट्रेन थांबली, व्हिडिओ पाहून नेटकरी संतप्त

IPL Mock Auction : ३०.५० कोटी! कॅमेरून ग्रीन ठरला IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू... CSK vs KKR मध्ये कोणी मारली बाजी?

धुरंधर Vs छावा! रणवीर सिंहच्या धुरंधरने मोडले सर्व रेकॉर्ड, 10 दिवसांची कमाई वाचून थक्क व्हाल!

Latest Marathi News Live Update : पुणे महापालिकेच्या ३ हजार ६२ कोटींच्या कामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन

SCROLL FOR NEXT