Sunny Deol Will Celebrates Raksha Bandhan with Esha Deol Dharmendra  esakal
मनोरंजन

Sunny Deol Gadar 2 : तब्बल ४३ वर्षांनी सनी हेमा मालिनीच्या मुलींकडून बांधून घेणार राखी?

गदर २ मुळे देओल कुटूंबियातील वाद मिटल्याचे बोलले जात आहे. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना दोन मुली आहेत.

युगंधर ताजणे

Sunny Deol Will Celebrates Raksha Bandhan with Esha Deol Dharmendra : देओल कुटूंबियांमध्ये सध्या आनंदाचे वातावऱण आहे. सनीच्या गदरनं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित गदर २ ने आतापर्यत अडीचशे कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याचे दिसून आले आहे.

यासगळ्यात गदर २ मुळे देओल कुटूंबियातील वाद मिटल्याचे बोलले जात आहे. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना दोन मुली आहेत. त्या नात्यानं सनीच्या सावत्र बहिणी आहेत. यापूर्वी कधीही त्यांच्यात बोलणे किंवा जाहीररित्या संवाद झाल्याचे ऐकीवात नाही.किंवा कोणत्याही चित्रपटामध्ये ते एकत्रित दिसलेही नाहीत. मात्र सनीच्या गदर २ च्या निमित्तानं ते पुन्हा एकदा एकत्र आल्याचे बोलले जात आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

गदर २ पाहण्यासाठी ईशा देओल थिएटरमध्ये आल्याचे दिसून आले. तिच्या व्हायरल व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. यात आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यात सनी देओल एक दोन नव्हे तर तब्बल ४३ वर्षांनी हेमा मालिनीच्या दोन्ही मुलींकडून राखी बांधून घेणार असल्याचे बोलले जात आहे. जी गोष्ट यापूर्वी कधीही झाली नव्हती ती आता होत असल्यानं चाहत्यांना त्याचे समाधान आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धर्मेंद्र यांचे कुटूंब आणि हेमा मालिनी यांचे कुटूंब एकत्र गुण्यागोविंदानं नांदणार असल्याची चर्चा आहे. गदर २ च्या स्क्रिनिंगच्या निमित्तानं सर्वजण एकत्र आले होते. आता तर धर्मेंद्र यांची पत्नी, खासदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांनी देखील गदर २ पाहिला. तो चित्रपट पाहताच मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सनीचे कौतुक केले आहे. धर्मेंद्र यांच्या दोन पत्नीविषयीची माहिती अनेकांना आहे.

धर्मेंद्र हे विवाहित असताना देखील त्यांनी ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांच्याशी लग्न केले होते. १९८० मध्ये त्यांनी धर्म परिवर्तन करुन हेमा मालिनी यांच्याशी संसार सुरु केला. त्यानंतर देओल कुटूंबियांमध्ये वादळ आले होते. यासगळ्यात मात्र पहिली पत्नी प्रकाश कौर यांनी कधीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

आता सनी देओल आणि हेमा मालिनीचं कुटूंब हे यंदा एकत्रितपणे रक्षाबंधन साजरी करणार असल्याचे बोललं जात आहे. करम देओलच्या लग्नानंतर आता पुन्हा एकदा देओल कुटूंबियांमध्ये आनंदाची बातमी समोर आली आहे. यावर चाहत्यांनी देखील त्यांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli RTO : वाहनधारकांना नाही शिस्त; ‘आरटीओ’ची वसुलीवर भिस्त; गतवर्षी २५ हजार कारवाया; ५ कोटी रुपयांची दंड वसुली

Viral News : प्राणी पाळत असाल तर सावधान ! कुत्र्याशी फक्त एक मिनिट खेळली महिला, नंतर अन् हात अ्न पाय कापावे लागले, नेमकं काय घडलं ?

Sanju Samson Struggle Story: बंदे में है दम...! संजू सॅमसन, आपला माणूस अन् त्याच्या पाठी खंबीर उभी राहणारी चारुलथा...

Vishwajit Kadam : राज्यातील प्रश्नांवर सरकारला जाग कधी?; आमदार विश्वजित कदम : विधानसभा अधिवेशनात सरकारला धारेवर धरले

Latest Marathi News Live Update : खामेनेई यांच्या हत्येविरोधात काश्मीरमध्ये दुसऱ्या दिवशीही निदर्शने

SCROLL FOR NEXT