Sunny Deol reaction after drunken video goes viral, says  SAKAL
मनोरंजन

Sunny Deol: मद्यधुंद अवस्थेतील 'तो' व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सनी देओलची प्रतिक्रिया, म्हणाला...

सनीचा नुकताच मद्यधुंद अवस्थेतला एक व्हिडीओ व्हायरल झाला होता

Devendra Jadhav

Sunny Deol Viral Video: अभिनेता सनी देओल सध्या चांगलाच चर्चेत आहे. सनीला यावर्षी गदर 2 च्या माध्यमातून चांगलाच धुराळा उडवला. सनी सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे, यामागचं कारण सुद्धा खास आहे.

सनीचा काही दिवसांपुर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात तो मुंबईतील जुहूच्या रस्त्यांवर नशेच्या अवस्थेत दिसला होता. पण काय होतं सनीच्या व्हिडीओमागचं सत्य? त्याने स्वतःच सांगितलंय.

म्हणुन सनी जुहूच्या रस्त्यावर नशेच्या अवस्थेत दिसला

सनी देओल मुंबईतील जुहूच्या रस्त्यावर मध्यरात्री नशेच्या अवस्थेत दिसला. पण आता या व्हिडीओचं सत्य समोर आलंय. सनी त्याच्या आगामी प्रोजेक्टच्या शुटींगसाठी अभिनय करत असल्याचं उघड झालंय.

सनीने स्वतः व्हिडीओ शेअर करत शुटींगचे BTS शेअर केलेत. यामध्ये कॅमेरामन त्याला चित्रीत करत असुन सनी त्यांच्यासमोर अभिनय करत असल्याचं पाहायला मिळतंय. "अफवाओ का सफर बस यही तक", असं कॅप्शन देऊन सनीने सर्वांची तोंडं बंद केली.

सनी देओलचा व्हायरल झालेला व्हिडीओ

सनी देओल मुंबईच्या जुहू सर्कलमध्ये रात्री उशिरा मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर फिरताना दिसला असा दावा करण्यात येत आहे. या व्हिडिओतही दिसते की सनी पाजी फुल टल्ली होऊन रस्त्यावर फिरत आहे.

तो एका ऑटो धडकणार इतक्यात त्या ऑटो चालकाने त्याला ओळखले आणि त्याची मदत केली. यानंतर त्या रिक्षा चालकाने सनीला पकडून ऑटोमध्ये बसवले.

या व्हिडिओत सनी रिक्षा चालकाशी बोलताना आणि हसताना दिसत आहे. तर व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीला ऑटोचालकाने फटकारले आणि बाजूला केले आहे.

सनी देओलविषयी थोडंसं

सध्या मनोरंजन विश्वात देओल परिवाराची बरिच चर्चा आहे. एकीकडे बॉबी देओल अ‍ॅनिमल' चित्रपटातून प्रेक्षकांची मन जिंकत आहे तर दुसरीकडे अभिनेता सनी देओलच्या 'गदर 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं होतं.

गदर 2 चित्रपटातून त्याने पुन्हा मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. मात्र सनी देओल सध्या चर्चेत आला आहे. काही दिवसांपुर्वी सनी पाजी चांगलाच ट्रोल झाला होता. दिवंगत दिग्दर्शक राजकुमार कोहलीच्या प्रार्थना सभेत हसताना दिसलेल्या सनीवर नेटकऱ्यांनी टीका केली होती. आता सनी नीतिश कुमार यांच्या आगामी रामायण सिनेमात बजरंगबलीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT