Sunny Deol Entry in Ramayan Esakal
मनोरंजन

Sunny Deol Entry in Ramayan: रणबीरच्या रामायणात आता 'गदर' होणार! सनी पाजी साकारणार 'ही' भूमिका?

Vaishali Patil

Sunny Deol Entry in Ramayan: सध्या रणबीर कपूर हा त्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'अ‍ॅनिमल' साठी चर्चेत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते त्याच्या टीझरची वाट पाहत आहेत. त्यातच रणबीर आणखी एका चित्रपटामुळे चर्चेत आहे तो म्हणजे रामायण. नितीश तिवारी यांच्या 'रामायण' या चित्रपटाची अधिकृत घोषणा झाली नसली तरी या चित्रपटाबाबत दररोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत.

या चित्रपटात मुख्य भुमिकेसाठी रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या नावाची चर्चा होत आहेत. यात रणबीर कपुर हा श्री रामाच्या भुमिकेत तर साई सीता मातेची भुमिका साकारणार आहे अशी चर्चा सुरु आहे.

'रामायण' चित्रपटासाठी रणबीर कपूरने मद्यपान आणि मांसाहार सोडल्याच्या बातम्याही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या.

आता या चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार आता रणबीरच्या या चित्रपटात सनी देओलची एन्ट्री होणार आहे. सनी देओल या चित्रपटात खुप महत्वाची भुमिका साकारणार आहे.

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, रणबीर कपूरच्या चित्रपटात सनी देओल भगवान हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र याबाबत काही अधिकृत बातमी समोर आलेली नाही.

तर दुसरीकडे नितेश तिवारीच्या 'रामायण' चित्रपटात केजीएफ स्टार यश रावणाची भूमिका साकारणार असल्याचा दावा देखील करण्यात येत आहे. मात्र यशने या भुमिकेसाठी नकार दिल्याचे कळते.

नितेश तिवारीच्या 'रामायण'मध्ये सनी देओलच्या एंट्रीनंतर चाहत्यांमध्ये पुन्हा या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.

रणबीर आणि साई या चित्रपटाची शूटिंग फेब्रुवारी 2024 पासून सुरू करणार आहेत. चित्रपटाचे शूटिंग ऑगस्ट 2024 पर्यंत संपणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT