Sunny Deol's Juhu Bungalow Not On The Block, Bank Withdraws Auction Notice Esakal
मनोरंजन

Sunny Deol's Juhu Bungalow: सनी देओलला बँकेचा दिलासा! बंगल्याच्या लिलावाला स्थगिती, हे आहे कारण

Vaishali Patil

Sunny Deol's Juhu bungalow not on sale: अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओलच्या मुंबईतील जुहू येथील बंगल्याचा लिलाव करण्यात येणार होता मात्र आता बँक ऑफ बडोदाने लिलावाची नोटीस मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. बँक ऑफ बडोदाने आज दिलेल्या एका निवेदनात असं म्हटलं आहे.

56 कोटींच्या थकबाकीबाबत बँक ऑफ बडोदाने सनी देओलला ही नोटीस पाठवली होती. इतकच नाही तर बँक ऑफ बडोदाने सनी देओलच्या व्हिलाच्या लिलावासाठी जाहिरात काढली होती.

मात्र आता तांत्रिक बिघाडामुळे लिलाव थांबवण्यात आल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता 56 कोटी रुपयांची थकबाकी दिल्यानंतर बँकेने सनी देओलच्या बंगल्याचा २४ तासांत लिलाव करण्याचा निर्णयाला स्थगिती दिली आहे. या कर्जावर जामीनदार म्हणून धर्मेंद्र यांची सही आहे.

गुरुदासपूरचा खासदार असलेल्या सनीने डिसेंबरपासून बँक ऑफ बडोदाकडून 55.99 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते जे तो अद्याप परत करू शकला नाही. बँकेची वसुली करण्यासाठी लिलावाची नोटीस बजावण्यात आली होती. या लिलावाची किंमत 51.43 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.

आता बँकेने एक निवेदन जारी केलं आणि त्यात म्हटलं आहे की, अजय सिंग देओलच्या संदर्भात विक्री लिलावाची ई-लिलाव नोटीस तांत्रिक कारणांमुळे मागे घेण्यात आली आहे.

सनी देओलचा हा बंगला जुहूच्या गांधी ग्राम रोडवर आहे. सनी या बंगल्यात राहत नाही, तिथे तो सुपर साउंड नावाचा रेकॉर्डिंग आणि डबिंग स्टुडिओ चालवतो.

सनी देओलच्या या बंगल्यात पार्किंगपासून ते पूल, चित्रपटगृह, हेलिपॅड एरिया, गार्डन अशा सर्व सुविधा आहेत. हा आलिशान बंगला निसर्ग सौंदर्याने वेढलेला आहे.

रेकॉर्डिंग आणि डबिंग स्टुडिओच्या चांगल्या व्यवसायामुळे हा बंगला देओल कुटुंबाच्या उत्पन्नाचा चांगला स्रोत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: मित्रासाठी सापळा रचला, पण स्वत:च अडकला; आरडीएक्ससह दहशतवादी हल्ला करणार असल्याचा कॉल तरुणाने का केला? सत्य समोर

Ganpati Visarjan 2025 Live Updates : १४ तासांच्या नंतर सुद्धा पुण्यात विसर्जन मिरवणुकीचा उत्साह कायम

Ohh Shit... टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज लंगडताना दिसला, तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह! Asia Cup पूर्वी वाढली डोकेदुखी

IndiGo flight technical glitch: कोचीहून अबुधाबीला १८० प्रवाशांसह निघालेल्या इंडिगो विमानात उद्भवला तांत्रिक बिघाड अन् मग...

"नागरिकांच्या जीवाची किंमत आहे का ?" टेस्ला कार घेतल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईकांना अभिनेत्याचा सवाल, "एवढा पैसा कुठून आला ?"

SCROLL FOR NEXT