Sunny Deol sakal
मनोरंजन

Sunny Deol: सनी देओलचा मुलगा करणने गुपचूप केली एंगेजमेंट... या दिवशी चढणार बोहल्यावर

सनी देओल हा बॉलिवूडचा एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्यांचे कुटुंब कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

Aishwarya Musale

सनी देओल हा बॉलिवूडचा एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्यांचे कुटुंब कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता त्याचा मुलगा करण देओलबद्दल मोठी बातमी येत आहे. सनी देओलचा लाडका मुलगा करण देओलने गुपचूप एंगेजमेंट केली असून लवकरच तो लग्न करणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

मात्र, त्याने कोणत्या मुलीसोबत लग्न केले आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

रिपोर्ट्सनुसार, आजोबा धर्मेंद्र आणि आजी प्रकाश कौर यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त करण देओलने त्याच्या लेडी लव्हशी एंगेजमेंट केली आहे. जूनमध्ये दोघांचे लग्न होणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

लग्नासाठी कमी वेळ शिल्लक आहे, अशा परिस्थितीत देओल कुटुंबीयांनी तयारी सुरू केली आहे. असे बोलले जात आहे की करण देओलच्या होणाऱ्या पत्नीचा चित्रपटसृष्टीशी काही संबंध नाही.

ही बातमी समोर आल्यानंतर करण देओलच्या होणाऱ्या पत्नीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. करणबद्दल सांगायचे झाले तर, त्याने 2019 मध्ये पल पल दिल के पास या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

हा चित्रपट सनी देओलनेच दिग्दर्शित केला होता. मात्र, हा चित्रपट काही खास कमाल करू शकला नाही. सनी देओलबद्दल सांगायचे झाले तर त्याचा गदर हा चित्रपट २ ऑगस्टला रिलीज होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अमिषा पटेल दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या ड्रायव्हरने अमली पदार्थ सेवन केले होते का? पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली

एकनाथ शिंदेंच्या सर्वात जवळचे मंगेश चिवटेंच्या भावावर जीवघेणा हल्ला; भाजप नेत्यानेच सुपारी दिल्याचा दावा

Mumbai Local: मुंबईच्या रेल्वे प्रवाशांनो सावधान! लोकलच्या मार्गावर मध्यरात्रीपासूनच मेगाब्लॉक, प्रवासापूर्वी 'हे' वेळापत्रक पहाच

Latest Marathi News Live Update : रामदास कदमांच्या बायकोनं स्वत:ला का जाळून घेतलं : अनिल परब

IND vs WI 1st Test Live: वेस्ट इंडिजचे ५ फलंदाज ४६ धावांत तंबूत! Ravindra Jadeja एवढा उत्साही झाला की, अपील करताना धडामssss पडला Video Viral

SCROLL FOR NEXT