Sunny Deol's Son Karan's Mystery Bride Is Drisha Acharya
Sunny Deol's Son Karan's Mystery Bride Is Drisha Acharya  Esakal
मनोरंजन

Karan Deol: होणार सुन मी देओल घराण्याची! करणची होणारी बायको अन् धर्मेंद्रच्या घरची नवी सुन आहे तरी कोण?

Vaishali Patil

Sunny Deol's Son Karan's Mystery Bride Is Drisha Acharya: गेल्या काही दिवसांपासून सनी देओलचा मुलागा करण देओल हा चर्चेत आहे. त्याने गुपचूप सारखपुडा उरकला असून तो लवकरच बोहल्यावर चढणार असल्याच्या चर्चाही सर्वत्र सुरु आहे. तो या वर्षी जूनमध्ये लग्न करण्याच्या तयारीत आहेत.

मात्र करणची होणारी बायको आहे तरी कोण, ती करते, काय आणि आहे कुठली असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडले होते. करणचे हृदय चोरणारी मिस्ट्री गर्ल कोण आहे? जी सनी देओलच्या घरची सून कोण आहे हे त्यांना जाणून घ्यायचं आहे. मात्र, आता करणच्या मिस्ट्री बायको अखेर समोर आली आहे.

रिपोर्ट्सनुसार, करण देओलची बायको दुबईची आहे आणि एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये मॅनेजर म्हणून काम करते. तर अनेक रिपोर्ट्समध्ये तिचं नाव द्रिशा रॉय असल्याचा दावा करण्यात आला होता. आता एका ताज्या अहवालात दावा करण्यात आला आहे की तिचे खरे नाव द्रिशा आचार्य आहे.

करण आणि द्रिशा बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दृष्टी करण देओलची गर्लफ्रेंड आहे आणि दोघेही खूप दिवसांपासून एकत्र आहेत. ती सध्या दुबईत असते. याशिवाय द्रिशा रॉय ही फॅशन डिझायनर देखील आहे. मात्र, करणप्रमाणेच द्रिशाचंही मनोरंजन विश्वाशी कनेक्शन समोर आलं आहे. ती हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ चित्रपट निर्माते बिमल रॉय यांची नात आहे.

दिशाच्या कौटुंबाबद्दल सांगायचं तर तिची आई चिमू बी. आचार्य 1998 मध्येच दुबईला गेले होते. ती एक जाहिरात एक्झिक्युटिव्ह होती आणि मिडिल ईस्ट मधील टॉप इवेंट मैनेजमेंट कंपनीची प्रमोटर देखील आहे. द्रिशा आचार्य हे आडनाव सोडून तिच्या पणजोबा बिमल रॉय यांचे आडनाव लावते.

आजोबा धर्मेंद्रच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी करण आणि द्रिशाने एंगेजमेंट केल्याचा दावा करण्यात येत आहे. ते लवकरच ब्रांदा येथील 'ताज लँड्स एंड' येथे ते विवाहबंधनात अडकणार आहेत. लग्नाची तारीख देखील ठरली आहे.

करण देओल बद्दल सांगायचं झालं तर 'पल पल दिल के पास' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र ते चित्रपट फारसा कमाल करू शकला नाही. करण लवकरच 'अपने 2' मध्ये दिसणार आहे ज्यात त्याचे आजोबा धर्मेंद्र आणि काका बॉबी देओल देखील आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

Weight Gain Foods : ‘या’ खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने झपाट्याने वाढू शकते वजन, खाण्यापूर्वी जरूर करा विचार

Rohit Sharma : 'रोहित शर्मा फॉर्मात येणे भारतीय संघासाठी...' भारताच्या दिग्गज खेळाडूचे मोठं वक्तव्य

Marathi News Live Update: पुण्यात चारचाकीच्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू

Chandu Champion Trailer: मुरलीकांत पेटकर यांची गोष्ट; प्रत्येक फ्रेममध्ये दिसते कार्तिक आर्यनची मेहनत, कसा आहे 'चंदू चॅम्पियन'चा ट्रेलर?

SCROLL FOR NEXT