Sunny Leone Google
मनोरंजन

बांग्लादेशमध्ये सनी लिओनीवर बंदी; म्हणाले,'आमच्या भूमीत दिसली तर...'

सनी लिओनी तिचा पहिला बंगाली सिनेमा शूट करण्यासाठी बांग्लादेशमध्ये जाणार होती.

प्रणाली मोरे

सनी लिओनी(Sunny Leone)ला बांग्लादेशनं पुन्हा एकदा वर्क परमिट देण्यासाठी नकार दिला आहे. २०१५ मध्ये देखील असंच घडलं होतं. पण यामुळे ती तिच्या 'सोल्जर' या आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी बांग्लादेशमध्ये जाऊ शकत नसल्याची बातमी कळाली आहे. पण याचा फटका निर्मात्याला बसला आहे. निर्मात्याला सनी तिथे पोहोचू शकली नाही म्हणून अख्खं शूटिंग कॅन्सल करावं लागलंय. सनी जर शूटिंगला पोहोचू शकली असती तर हा तिचा पहिला बंगाली सिनेमा असता.

सनी लिओनीचा लवकरच पहिला बांग्लादेशी सिनेमा येईल असं बोललं जात आहे. या सिनेमाला घेऊन सनीच्या चाहता वर्गात मोठा उत्साह पहायला मिळतोय. पण सूत्रांच्या माहितीनुसार सनीच्या एका सिनेमाच्या शूटिंगला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. म्हणजे काही ना काही अडचणी येत असल्याचं बोललं जात आहे. या सिनेमाचं नाव 'सोल्जर' आहे. सनीला बांग्लादेशनं वर्क परमीट देण्यास नकार दिला आहे. कळालेल्या माहितीनुसार सनीला वर्क परमीट 'मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अॅन्ड ब्रॉडकास्टिंग बांग्लादेश'ने रद्दबातल केलं आहे. हे करण्यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसलं तरी अफवा आहे की बांग्लादेशमधील ईस्लामिक संघटनांनी सनीला त्यांच्या देशात येण्यासाठी विरोध दर्शविला आहे.

जर सरकारनं सनीला वर्क परमीट दिलं तर सरकारविरोधात आंदोलन करण्याचा इशारा त्यांच्यातर्फे देण्यात आला आहे. याआधी बांग्लादेशच्या 'मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अॅन्ड ब्रॉडकास्टिंग'नं भारतीय कलाकारांना बांग्लादेशमध्ये 'सोल्जर' या सिनेमासाठी शूटिंगला येण्यासाठी परवानगी दिली होती. 'सोल्जर' या सिनेमाचं दिग्दर्शन शमीम अहमद रोनी करीत आहे. भारतातनं १० कलाकारांना ५ मार्च २०२२ ते ४ सप्टेंबर २०२२ पर्यंतचा वर्क परमिट बांग्लादेशनं दिला आहे,पण त्या दहा नावांत सनीचं नाव नाही असं समोर आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT