Sunny Leone’s Kennedy movie to be screened at Sydney Film Festival sakal
मनोरंजन

Sunny Leone: कान्स गाजवल्यानंतर सनी लिओनीचा 'केनेडी' आता सिडनी फिल्म फेस्टिव्हल मध्ये झळकणार..

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये यश मिळवल्यानंतर सनी लिओनीच्या 'केनेडी' ला पुन्हा बहुमान..

नीलेश अडसूळ

पोर्नस्टार म्हणून जगभर ओळख असणारी आणि नंतर अभिनयातून बॉलीवुड मध्ये पदार्पण करणारी सनी लिओनी कायमच चर्चेत असते. ती सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय असते. आज तिला अभिनत्री म्हणून एक वेगळी ओळख मिळाली असून तिने सर्वांच्याच नजरा बदलून टाकल्या आहेत.

तीचा पोर्न इंडस्ट्री मधील काम थांबवण्याचा निर्णय असो किंवा मूल दत्तक घेण्याचा.. तिच्या प्रत्येकच निर्णयाने तिचे चाहते खुश झाले आहेत. आज पुन्हा एकदा सनी चर्चेत आली आहे. कारण तिच्या आगामी चित्रपटाचे सिडनी फिल्म फेस्टिवल मध्ये स्क्रीनिंग होणार आहे. या आधी या चित्रपटाने 'कान्स' फिल्म फेस्टिवल गाजवला होता.

(Sunny Leone’s Kennedy movie to be screened at Sydney Film Festival)

जिच्या फॅशन ने कान्स फेस्टिवल मध्ये अभूतपूर्व यश आणि कौतुक मिळवलं अशी अभिनेत्री सनी लिओनी ! सनी दरवर्षी विविध भूमिका साकारत असते जगभरात तिच्या कामाच्या चर्चा होत असताना ती तिचा आगामी चित्रपट केनेडी आता सिडनी फिल्म फेस्टिवल मध्ये जाऊन पोहचला आहे. केनेडी मध्ये सनी चार्लीची भूमिका करत आहे जी भूमिका नक्कीच कमालीची आहे.

या चित्रपटाची नुकतीच आदरणीय ज्युरींनी कान्स चित्रपट महोत्सवात मिडनाईट स्क्रीनिंगसाठी निवड केली होती. मध्यरात्रीच्या प्रदर्शनासाठी निवडलेला हा एकमेव भारतीय चित्रपट होता. या चित्रपटाने सात मिनिटांची स्टँडिंग ओव्हेशन देखील मिळवला.

सनी लिओनीच्या चार्लीमध्ये केलेल्या भूमिकेचं कौतुक होतंय. कान्स पर्यंत मर्यादित न राहता हा चित्रपट सिडनी फिल्म फेस्टिवल मध्ये दाखवला जाणार आहे. सिडनी फिल्म फेस्टीवल १४ आणि १७ जून रोजी होणार आहे.

सिडनी फिल्म फेस्टिव्हलबद्दल अधिक बोलताना सनी सांगते " कान्स फिल्म फेस्टिव्हल खूप यशस्वी ठरला आणि मी य साठी खूप कृतज्ञ आहे. हा चित्रपट आता सिडनी फिल्म फेस्टिव्हल मध्ये दाखवला जाणार आहे. अनुराग सर आणि संपूर्ण टीमचे आभार मानते की यासारखा उत्तम चित्रपट मला करायला मिळाला.

केनेडीचे दिग्दर्शन अनुराग कश्यप यांनी केले असून त्यात राहुल भट्ट सहकलाकार आहेत. केनेडी च्या सोबतीने सनी कडे अजून कमालीचे प्रकल्प आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: कपडे फाटेपर्यंत मारेन…, महिला ट्रॅफिक पोलिसांसोबत प्रवाशाचे अश्लील वर्तन; मुंबईत नेमकं काय घडलं? VIDEO VIRAL

Vasota Fort Tourism Development : वासोटा किल्ल्याचं रूप पालटलं! आता दरीच्या टोकावर उभं राहून फोटो काढणं होणार सोपं; गडावर वन विभागानं असं काय केलंय?

Latest Marathi News Live Update : अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का, जिल्हा उपाध्यक्षांचा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा

Mulank : 'या' 3 महिन्यात जन्मलेल्या लोकांचे 35 वयानंतर चमकते नशीब; असतात लक्ष्मी-कुबेरचे लाडके, पण त्याआधी करावा लागतो खूप संघर्ष

Investment Planning: गुंतवणुकीत एक्झिट स्ट्रॅटेजी नसलेल्या गुंतवणूकदारांवर का येते पश्चात्तापाची वेळ?

SCROLL FOR NEXT