Sunny Leone Looks Hot As She Rules The Red Carpet Of The Sydney Film Festival sakal
मनोरंजन

Sunny Leone: सनी लिओनीला पाहून 'सिडनी'कर घायाळ.. खास लुकने गाजवला फिल्म फेस्टिव्हल..

सिडनी फिल्म फेस्टिव्हल च्या रेड कार्पेटवर सनीचा अनोखा लूक!

नीलेश अडसूळ

Sunny Leone in Sydney Film Festival: फॅशन आयकॉन आणि मॉडेल म्हणून जगभर ओळख असणारी आणि नंतर अभिनयातून बॉलीवुड मध्ये पदार्पण करणारी सनी लिओनी कायमच चर्चेत असते. ती सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय असते.

आज तिला अभिनत्री म्हणून एक वेगळी ओळख मिळाली असून तिने सर्वांच्याच नजरा बदलून टाकल्या आहेत. तीचा पोर्न इंडस्ट्री मधील काम थांबवण्याचा निर्णय असो किंवा मूल दत्तक घेण्याचा..

तिच्या प्रत्येकच निर्णयाने तिचे चाहते खुश झाले आहेत. आज पुन्हा एकदा सनी चर्चेत आली आहे. कारण सध्या ती सिडनी फिल्म फेस्टिवल मध्ये गेली आहे. तिच्या 'केनेडी' चित्रपटाचं तिथे स्क्रीनिंग होणार आहे.

या फेस्टिवलसाठी सनीने केलेला खास लुक नुकताच समोर आला आहे, हा लुक पाहून नेटकरीच नाही तर समस्त 'सिडनी'करही तिच्यावर फिदा झाले आहेत.

(Sunny Leone Looks Hot As She Rules The Red Carpet Of The Sydney Film Festival)

अभिनेत्री सनी लिओनी तिच्या फॅशन गेममुळे कायम चर्चेत असते. आधी कान्स फिल्म फेस्टिव्हल आणि आता सिडनी फिल्म फेस्टिवल तिच्या फॅशन च्या अनोख्या अदा बघून सगळेच अवाक आहेत.

कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये 'केनेडी' चित्रपटाने सगळ्यांची मन जिंकल्या नंतर आता हा चित्रपट सिडनी फिल्म फेस्टिव्हलमध्ये जाऊन पोहचला आहे. सिडनी फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या फॅशन आणि फिल्म दोन्हीच्या चर्चांना उधाण आलं असल्याचं समजतंय !

सिडनी फिल्म फेस्टिव्हलमध्ये केनेडीच्या स्क्रिनिंगसाठी सनीने साईशा शिंदेचा मोहक स्ट्रॅपलेस फिकट निळा फ्लोय ड्रेस घातला आणि सनीच सौदर्य अजून खुलून आलं. हा स्टायलिस्ट लूक हितेंद्र कपोपारा याने स्टाइल केला होता.

सिडनी फिल्म फेस्टिव्हलमध्ये सनी लिओनी हिने तिच्या फॅशन ने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. मॉडिश लुक्स आणि फॅशन आयकॉन असलेली सनी या अनोख्या लूक मध्ये मनमोहक दिसत होती.

केनेडी हा चित्रपट भारतात प्रदर्शित होण्याची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत. केनेडी च्या सोबतीने सनी अनेक नवीन भूमिका मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजतय.

तिच्या या लुकची सध्या सोशल मिडियावरही भरपूर चर्चा आहे. नेटकऱ्यांनी तिचं कौतुक करत कमेंटचा नुसता पाऊस पाडला आहे. तर सिडनीमध्येही सनीने आपल्या जबरदस्त लुकनं सर्वांवर छाप पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT