Sunny Leone esakal
मनोरंजन

Sunny Leone: सनी लिओनीचा 'जबरा फॅन'; हातावर काढला टॅटू, व्हिडीओ शेअर करुन बेबी डॉल म्हणाली...

Sunny Leone: नुकताच सनीनं तिच्या चाहत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सनीच्या चेहऱ्याचा टॅटू एका तरुणानं त्याच्या हातावर काढलेला दिसत आहे.

priyanka kulkarni

Sunny Leone: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची पसंती मिळते. सनीचा चाहता वर्ग मोठा आहे. सनी तिच्या ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना घायाळ करते. नुकताच सनीनं तिच्या चाहत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सनीच्या चेहऱ्याचा टॅटू एका तरुणानं त्याच्या हातावर काढलेला दिसत आहे.

आपल्या आवडत्या सेलिब्रिटींवर प्रेम दाखवण्याची प्रत्येकाची एक वेगळी गोष्ट असते. चाहत्यांच्या प्रेमाची ही गोष्ट काही वेगळी आहे. सनी लिओनीचा असाच एक चाहता आहे ज्याने आपल्या हातावर सनीचा चेहऱ्याचा टॅटू करून घेतला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.सोशल मीडियावरील हा व्हिडीओ पोस्ट होताच व्हायरल झाला आहे.

सनीनं शेअर केला व्हिडीओ

सनीनं तिच्या चाहत्याच्या टॅटूचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करुन सनीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "टॅटू हे आयुष्यभर राहतात, या प्रेमासाठी तुमचे आभार"

Sunny Leone

पाहा व्हिडीओ:

बॉलिवूडची बेबी डॉल अशी सनीची ओळख आहे. सनीनं जिस्म-2 या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'करनजीत कौर - द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओन' ही सनीच्या आयुष्यावर आधारित वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

'स्प्लिट्सविला X5' होस्ट करणार सनी

सनी 'ग्लॅम फेम' शोला जज करताना आणि बहुप्रतिक्षित रिॲलिटी शो 'स्प्लिट्सविला X5' होस्ट करताना दिसणार आहे. याशिवाय ती अनुराग कश्यपच्या 'केनेडी' आणि 'कोटेशन गँग' नावाच्या तमिळ चित्रपटातही दिसणार आहे. सनीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thackeray Brothers Morcha : निवडणूक आयोगाविरोधात आज ठाकरे बंधूंचा महामोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी होण्याची शक्यता, मोर्चा कधी अन् कुठून निघणार?

Pusad Excise Constable Attack : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला लाच मागितल्याच्या वादातून मारहाण; आरोपी अटकेत

Latest Marathi News Live Update : मोर्चासाठी ठाण्यातून शिवसैनिक-मनसैनिक मुंबईकडे रवाना

Samruddhi Expressway Accident : समृद्धीवर पुन्हा भीषण अपघात १७ जण जखमी ; पीकअपचा टायर निघाल्याने वाहन उलटले

Konkan Water: कोकणचे पाणी घाटमाथ्यावर आणणे शक्य : प्रफुल्ल कदम; ‘वॉटर लिंक टनेल्स’ उभा करण्याचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT